राज्यपालांच्या पत्राने मी झालो विधानपरिषदेवर आमदार! खोट्या सहीचे पत्र केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 13:36 IST2021-10-09T13:20:07+5:302021-10-09T13:36:01+5:30
राज्यपालांच्या खोट्या सहीचे ते पत्र एका संगणकावर तयार केलेले होते.

राज्यपालांच्या पत्राने मी झालो विधानपरिषदेवर आमदार! खोट्या सहीचे पत्र केले व्हायरल
पिंपरी: विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याचे नमूद करून महाराष्ट्राच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) खोट्या सहीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हनुमान मंदिरा शेजारी, खराळवाडी, पिंपरी येथे २५ सप्टेंबरला दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
प्रमोद ठोंबरे (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. अजीज नवाब शेख (वय ४३, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद ठोंबरे हा फिर्यादी अजी शेख यांच्याकडे चालक म्हणून कामास होता. त्याने राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र तयार केले. फिर्यादी अजीज शेख यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाली आहे, त्या पत्रात खोटे नमूद केले.
राज्यपालांच्या खोट्या सहीचे ते पत्र एका संगणकावर तयार केले. तो बनावट दस्तावेज ठकवणूक करण्याच्या उद्देशाने तसेच फिर्यादी अजीज शेख यांच्या नावलौकीकास बाधा निर्माण करण्याच्या हेतूने व्हाॅटसअपवर पाठविले. तसेच फिर्यादीच्या भावाच्या व्हॉटसअप नंबरवरसुद्धा तेच मेसेज पाठविले आहेत. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.