Pimpri Chinchwad: वाहनांची तोडफोड करत टोळक्याचा हल्ला, चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 13:06 IST2023-08-26T13:05:31+5:302023-08-26T13:06:39+5:30
या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाल्याची माहिती चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली....

Pimpri Chinchwad: वाहनांची तोडफोड करत टोळक्याचा हल्ला, चिंचवडमधील घटना
पिंपरी : आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दोन जणांसह महिलेवर जीवघेणा हल्ला केला. या हल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२५) मध्यरात्री दीडच्या सुमारास आनंदनगर, चिंचवड येथे घडली. सुभाष शिंदे (रा.चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नरेश उर्फ कृष्णा भंडारी (वय १९), आदित्य आणि त्यांचा एक साथीदार (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाल्याची माहिती चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरांसमोर पार्क केलेल्या वाहनांची संशयित आरोपी तोडफोड करत होते. तसेच कोयता, लोखंडी रॉड, सिमेंट गट्टू या हत्यारांसह दहशत माजवत होते. त्यांनी दोन जणांसह एका महिलेवर जीवघेणा हल्ला केला. तसेच परिसरातील आठ ते नऊ वाहनांची तोडफोड केली. टोळक्याचा धुडगूस सुरू असताना फिर्यादी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. यात शिंदे यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तोडफोड करणार्यांना चांगला चोप दिला. यात आरोपी नरेश हा जखमी झाला.