सुनेच्या छळप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी महापौरासह पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:02 PM2021-10-14T21:02:17+5:302021-10-14T21:05:17+5:30

पिंपरी : शिवीगाळ व मारहाण करून सुनेचा छळ केला. याप्रकरणी पिंपरी -चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यासह ...

former ncp pcmc mayor crime charged harassment case | सुनेच्या छळप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी महापौरासह पाच जणांवर गुन्हा

सुनेच्या छळप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी महापौरासह पाच जणांवर गुन्हा

Next

पिंपरी : शिवीगाळ व मारहाण करून सुनेचा छळ केला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संभाजीनगर, पुणे येथे २९ मे २०२१ ते २५ जून २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित विवाहितेने पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कुशाग्र कदम, मंगला कदम, अशोक कदम, गौरव कदम, स्वाती कदम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी विवाहित महिलेचा पती कुशाग्र कदम याला गंभीर आजार असल्याचे माहित असतानाही तो लपवून फिर्यादीसोबत त्याचे लग्न लावून दिले. फिर्यादीला आजार असल्याचे डाॅक्टरांशी संगनमत करून खोटे निदान केले. तसेच आयव्हीएफ उपचार पद्धतीने मूल होण्यासाठी फिर्यादी महिलेवर प्रयोग केला. फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: former ncp pcmc mayor crime charged harassment case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app