Chinchwad By Election | मतमोजणीमुळे थेरगाव परिसरातील वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 11:02 IST2023-03-01T11:00:46+5:302023-03-01T11:02:36+5:30
थेरगाव येथे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व वाहनांना वाहतुकीस बंदी...

Chinchwad By Election | मतमोजणीमुळे थेरगाव परिसरातील वाहतुकीत बदल
पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या, गुरुवारी (दि. २) असून, त्याची मतमोजणी कामगार भवन कार्यालय, थेरगाव येथे होणार आहे. त्यामुळे वाहतुकीत खंड पडून ती विस्कळीत होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली.
थेरगाव येथील कामगार भवन कार्यालयात मतमोजणी होणार असल्याने तापकीर चौक ते ग प्रभाग महापालिका शाळा, थेरगाव येथे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व वाहनांना वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.
वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून तापकीर चौकातून थेरगावकडे येणारी वाहनांना काळेवाडी फाटा किंवा एम. एम. स्कूल या मार्गाने वळविण्यात आली आहे. ग प्रभाग महापालिका शाळा, थेरगावकडे येणारी वाहतूक ही बारणे कॉर्नरवरून डांगे चौकमार्गे किंवा बिर्ला हॉस्पिटलमार्गे वळविण्यात आली आहे. ही गुरुवारपुरती तात्पुरती पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.