Chinchwad By Election: "मी देत आहे राष्ट्रवादीला शाप..." चिंचवड पोटनिवडणुकीत रामदास आठवलेंची कविता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 21:18 IST2023-02-23T21:14:52+5:302023-02-23T21:18:54+5:30
भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते...

Chinchwad By Election: "मी देत आहे राष्ट्रवादीला शाप..." चिंचवड पोटनिवडणुकीत रामदास आठवलेंची कविता
पिंपरी : मी देत आहे राष्ट्रवादीला शाप कारण निवडून येणार आहे अश्विनी जगताप, नरेंद्र मोदी आहे सगळ्यांचे बाप, मग का नाही येणार अश्विनी जगताप, देवेंद्र आणि मी घेऊन आलोय जय भीमची काठी, कारण आम्ही दोघेही आहोत अश्विनीताईंच्या पाठी, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. आठवले म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही इच्छा होती. अजित पवार म्हणाले होऊन जाऊ द्या, असे जर आहे तर आता होऊनच जाऊ द्या. प्रधानमंत्री बनण्यासाठी एका बाजूला अनेक जन इच्छुक आहेत. मी म्हणालो होतो 'जितनी बढानी है दाढी पर राहुल गांधी की नही उनके जैशी बॉडी'. नरेंद्र मोदी हे 2024 ला प्रधानमंत्री होणारच आणि ते झाले की मी मंत्री होणारच असे म्हणताच मैदानात हशा पिकला.
ते संविधान बदलतील कसे?
बाबासाहेब यांचे नाव घेणारे मोदी त्यांचे संविधान बदलतील कसे? संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जे लोक आरोप करतात त्यात तथ्य नाही, असे रामदास आठवले म्हणाले.