चिंचवडगावातील वाहतुकीमध्ये बदल, वाहतूक विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:59 IST2022-04-06T19:58:11+5:302022-04-06T19:59:49+5:30
महापालिकेतर्फे चापेकर चौकात सुशोभीकरण तसेच रस्त्याचे काम करण्यात येत आहे...

चिंचवडगावातील वाहतुकीमध्ये बदल, वाहतूक विभागाची माहिती
पिंपरी : महापालिकेतर्फे चिंचवडगावातील चापेकर चौक येथील रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मोरया हॉस्पिटलकडून चापेकर चौकात येणाऱ्या वाहनांना मनाई केली आहे. गुरुवारपासून (दि. ७) याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे आदेश दिले.
महापालिकेतर्फे चापेकर चौकात सुशोभीकरण तसेच रस्त्याचे काम करण्यात येत आहे. या कामाचा पुढील टप्पा म्हणजे मोरया हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे एका बाजुची वाहतूक बंद करावी लागणार आहे. यामुळे मोरया हॉस्पिटलकडून येणाऱ्या वाहनांना मनाई केली आहे. मात्र मोरया हॉस्पिटलकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहणार आहे. मोरया हॉस्पिटलकडून चापेकर चौकात येणारी वाहने पॉवर हाऊस चौकातून भोईर आळी येथून चापेकर चौकात येणार आहे. २० दिवसांकरिता हा बदल असणार आहे. महापालिकेकडून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे.