Chinchwad By-Election | "एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून…" पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 17:24 IST2023-02-11T17:19:11+5:302023-02-11T17:24:22+5:30
यापुर्वी पुणे शहरात कसबा पेठ मतदार संघात यासंदर्भात बॅनर लागले होते...

Chinchwad By-Election | "एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून…" पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले बॅनर
पिंपरी : पुणे शहरातील फ्लेक्सबाजीचे लोण आता पिंपरी-चिंचवडमध्येही पसरले आहे. चिंचवडमधील काही चौकांमध्ये "एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून…नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी, एकदम ओके डोक्यातून... खरा शिवसैनिक" असे या बॅनरमध्ये म्हटले आहे. हे बॅनर दिवसभर सोशल मीडियात फिरत होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे राजकारण तापले आहे. परंतु हे बॅनर कोणी लावले? हे स्पष्ट झाले नाही. यापुर्वी पुणे शहरात कसबा पेठ मतदार संघात यासंदर्भात बॅनर लागले होते. त्यामुळे या बॅनरमागे आहेत तरी कोण? हा शोध त्या अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते घेऊ लागले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्स लावण्यात आले आहे. त्यामाध्यमातून एक शिवसैनिक या नावाने बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच एका अपक्षांच्या शिवसेनेतील विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजपच्या या बालेकिल्ल्यात एक पोस्टर झळकला. कुलकर्णीचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असे बॅनर पुण्यात लागेल होते. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातही बॅनर लागले आहेत.