पिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय? दमण आणि दीव उत्तम पर्याय...

By मोरेश्वर येरम | Published: January 17, 2021 06:42 PM2021-01-17T18:42:42+5:302021-01-17T19:11:55+5:30

तुम्ही जर पिकनिकचा प्लान करत असाल आणि यावेळी जरा हटके लोकेशन शोधत असाल तर "दमण आणि दीव" हा उत्तम पर्याय आहे.

दमण आणि दीवमधील सुंदर लोकेशन्स आणि शांतता तुमचं मन मोहून टाकेल. भारताच्या या दोन्ही प्रदेशांमध्ये अनेक आकर्षक आणि सुंदर ठिकाणं आहेत.

दमणगंगाच्या उत्तर किनारी भागात जीरोम नावाचा किल्ला आहे. सेंट जीरोम यांचं नाव या किल्ल्याला देण्यात आलं आहे. या किल्ल्याची सर्वात खास गोष्टी म्हणजे यात 'अवर लेडी ऑफ द सी' नावाचा पोर्तुगालच्या काळातील एक सुंदर चर्च आहे. यासोबत इथं पोर्तुलागच्या युद्धाच्या आठवणी देखील पाहायला मिळतात.

दमण आणि दीवच्या सौंदर्याला 'चार चाँद' लावणारा नागोआ बीच सर्वांच आकर्षण ठरतो. विशेष म्हणजे, या समुद्र किनाऱ्यावर अत्यंत तुरळग गर्दी असते आणि समुद्राचं नीळशार पाणी मनमोहून टाकणारं आहे. दमण आणि दीवमध्ये तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर नागोआ बीचवर नक्कीच भेट द्या.

दमणचा देवका बीच देखील प्रसिद्ध आहे. पर्यटकांची या समुद्रकिनाऱ्याला चांगली पसंती मिळते. संध्याकाळी या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यास पर्यटक पसंती देतात. फोटोग्राफीसाठी अत्यंत सुंदर ठिकाण आहे.

मीरासोल गार्डनला Kadaiya Lake Garden पण म्हटलं जातं. या गार्डनमध्ये बोट फेरी सुद्धा उपलब्ध आहे.

दमणच्या सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून जंपोर बीचची ओळख आहे. या समुद्रात पोहण्यासाठी पर्यटक पसंती देतात. या किनाऱ्यावरील शांत आणि आल्हाददायक वातावरण तुमचं लक्ष वेधून घेतील. पिकनिक आणि मित्रमंडळींसोबत एन्जॉय करण्यासाठी हा समुद्रकिनारा सर्वात बेस्ट आहे.

दमणगंगाच्या किनाऱ्यावरील लाइटहाऊस देखील प्रेक्षणीय स्थळ आहे. यासोबतच दमण आणि दीवमध्ये हिंडण्यासाठी इतर अनेक ठिकाणं देखील आहेत.

दमण आणि दीवमध्ये फिरण्यासाठी दमणगंगा, Our Lady of Rosary Chapel, हिल्सा अक्वेरियम, Kachigam Water Tank, हाथी पार्क, ब्रिज साइड गार्डन आणि बॉम जीजस चर्च ही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.