Maharashtara Bandh: 'महाराष्ट्र बंद'मुळे पुण्यात शुकशुकाट; पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 20:49 IST2021-10-11T20:15:56+5:302021-10-11T20:49:20+5:30
आज राज्यभर महाविकास आघाडी आणि विविध कामगार संघटना आणि शेतकऱ्यांतर्फे महाराष्ट्र बंद (maharashtra bandh) ठेवण्यात आला होता. लखीमपूर खेरी हत्याकांडाचा (lakhimpur kheri violence) निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये पुण्यात काही ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर काही भागात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे जाणवले. दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील बससेवाही बंद होती. काही ठिकाणी मविआचे कार्यकर्ते रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. (फोटो- तन्मय ठोंबरे)

मविआतर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता, आघाडीतील विविध पक्षीय नेते रस्त्यावरील उतरले होते

चंदननगर परिसरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला

लक्ष्मी रस्त्यावरील तुरळक वाहतूक

शहरातील अनेक मॉल्सही बंद ठेवण्यात आले होते

काही ठिकाणी विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले नव्हते.

मार्केट यार्डातील शुकशुकाट

नगर रोड परिसर


















