महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 01:38 PM2019-10-25T13:38:28+5:302019-10-25T13:54:16+5:30

राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. या बड्या व दिग्गज नेत्यांना पराभूत करणारे हे आहेत जायंट किलर...

धनंजय मुंडे - विजयी आणि पंकजा मुंडे (भाजप) - पराभूत

परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. मुंडे भावंडांमधील लढत लक्षवेधी ठरली. त्यात धनंजय यांनी बाजी मारली.

संदीप क्षीरसागर - विजयी आणि जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) - पराभूत

राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत दाखल होत थेट मंत्रिपद मिळविणारे जयदत्त क्षीरसागर या दिग्गज नेत्याचा पराभव त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर यांनी केला.

रोहित पवार - विजयी आणि राम शिंदे (भाजप) - पराभूत

शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून विधानसभेत दणक्यात प्रवेश केला.

देवेंद्र भुयार - विजयी आणि अनिल बोंडे (भाजप) - पराभूत

राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे या भाजप नेत्याचा अनपेक्षित पराभव करून देवेंद्र भुयार जायंट किलर ठरले.

अभिमन्यू पवार - विजयी आणि बसवराज पाटील (काँग्रेस) - पराभूत

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी सलग दोन टर्म आमदार राहिलेले काँग्रेस नेते बसवराज पाटील यांचा पराभव करून राज्याचे लक्ष वेधले.

नीलेश लंके - विजयी आणि विजय औटी (शिवसेना) - पराभूत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांचा पराभव करून नीलेश लंके हे जायंट किलर ठरले.

राजेश एकडे - विजयी आणि चैनसुख संचेती (भाजप) - पराभूत

चैनसुख संचेती यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे. कारण या ज्येष्ठ नेत्याचा पराभव राजेश एकडे या तरुण उमेदवाराने केला.

दिलीप लांडे विजयी आणि नसिम खान (काँग्रेस) - पराभूत

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसिम खान हे हमखास विजयी होणार असे गणित मांडले जात होते. मात्र शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी त्यांचा अनपेक्षितपणे पराभव केला.