या भन्नाट गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील; वाचाल तर हैराण व्हाल...

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1986 साली शारजा येथे सामने खेळवण्यात येणार होते. सामन्यापूर्वी कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमने भारतीय संघाला एक ऑफर दिली होती. तुम्ही जर पाकिस्तानला पराभूत केले तर सर्व खेळाडूंना एक कार मिळेल. या सामन्यानंतर दाऊद भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये आला. त्यावेळी कर्णधार कपिल देव यांनी त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि दाऊद निघून गेला.

जॉन राईट हे शांत प्रशिक्षक होते. पण एकदा ते सेहवागवर भडकले. कारण सेहवाग चुकीचा फटका मारून आऊट झाला होता. तो जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये सेहवाग आला तेव्हा जॉन यांनी त्याची कॉलक पकडली आणि त्याच्यावर राग व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी राहुल द्रविडला सांगितले की, "सेहवाग जर असाच परत आऊट झाला तर त्याला संघातून बाहेर काढण्यात येईल."

युवराज सिंगने 2000 साली आयसीसीच्या नॉक आऊट स्पर्धे युवराजने पदार्पण केले. या सामन्यापूर्वी कर्णधार सौरव गांगुलीने युवीला सांगितले की, तू सलामीला येशील ना? त्यावर युवीने होकार दिला. पण मनातल्या मनात तो घाबरला होता. पण दुसऱ्या दिवशी गांगुलीने त्याला सांगितले की, मी मस्करी करत होतो.

भारताचा संघ 2005 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताच्या संघातील खेळाडूंनी कर्णधार सौरव गांगुलीला घेराव घातला आणि त्याने आपली तक्रार केल्याचे सर्व खेळाडू म्हणत होते. त्यावेळी गांगुलीने या गोष्टी नाकारल्या आणि कर्णधारपद सोडण्यास तयार असल्याचेही सांगितले. त्यावेळी राहुल द्रविडने आज एप्रिल फूल असल्याचे सांगितले आणि एकच हशा पिकला.

ऑस्ट्रेलियाने 2003 साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत 359 धावांचे आव्हान भारताला दिले होते. त्यावेळी माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ड्रेसिंग रुममध्ये एक भाषण दिले होते. त्यानुसार प्रत्येक षटकात एक चेंडू मारल्यावर भारत हा सामना जिंकू शकतो, असे त्याचे म्हणणे होते. पण अखेर भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. जेव्हा सचिनने मुनाफला एक प्रश्न विचारला होता भारताला 2007च्या विश्वचषकात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर सचिनने गोलंदाज मुनाफ पटेलला विचारले होते, तुला आता भारतात जायला भिती नाही का वाटत? त्यावर मुनाफने 'नाही' उत्तर दिले होते.

भारतीय संघात प्रत्येक खेळाडूची टोपणनावं आहेत. पण भारतीय संघातील 'बिहारी' कोण? हे तुम्हाला माहिती आहे का? युवराज सिंग हा महेंद्रसिंग धोनीला या नावानेच जास्त चिडवायचा.

विराट कोहली भारतीय संघात पहिल्यांदाच आला होता. त्यावेळी काही खेळाडूंनी त्याला सांगितले की, " संघात जो नवीन खेळाडू येतो, तो सचिनच्या पाया पडतो." त्यानुसार कोहली सचिनजवळ गेला आणि त्याच्या पाया पडला. त्यानंतर सर्वच खेळाडू पोट धरून हसायला लागले आणि आपला गेम झाल्याचे कोहलीलाही समजले.

सुधीर कुमार चौधरी हा सचिनचा कट्टर भक्त आहे. या गोष्टीची जाणीव सचिनलाही आहे. त्यामुळेच भारताने जेव्हा 2011 साली विश्वचषक जिंकला तेव्हा सचिनने सुधीरला थेट ड्रेसिंग रुममध्ये बोलावले होते.

भारताला 2007च्या विश्वचषकात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर सचिनने गोलंदाज मुनाफ पटेलला विचारले होते, तुला आता भारतात जायला भिती नाही का वाटत? त्यावर मुनाफने 'नाही' उत्तर दिले होते.

सुनील गावस्कर आणि फारुख इंजिनिअर यांची 1971 साली रेस्ट ऑफ वर्ल्डच्या टीममध्ये निवड झाली होती आणि त्यांच्या संघाचा सामान ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे होणार होता. फारुख हे सुनील यांच्यासाठी सिनीअर होते. त्यामुळे त्यांनी सामन्यापूर्वी सुनील यांना पेव्हेलियनमध्ये एक सल्ला दिला. त्यांनी सुनील यांना सांगितले की, " तु शून्यावर आऊट होऊ नकोस." या सामन्यात सुनील यांनी धावा केल्या, पण सल्ला देणारे इंजिनिअरच शून्यावर बाद झाले.