WTC Final 2021 IND vs NZ : पहिल्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे रद्द; जाणून घ्या उर्वरित चार दिवस तरी होईल का खेळ, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 03:31 PM2021-06-18T15:31:47+5:302021-06-18T15:37:32+5:30

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारत-न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल लढतीच्या पहिल्या दिवसाचा पहिले सत्र पावसामुळे रद्द करण्यात आले. आता टॉससाठी क्रिकेट चाहत्यांना पाच वाजेपर्यंतची प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.

इंग्लंडमधील वातावरणाच्या लहरीपणाचा फटका या सामन्याला पहिल्याच दिवशी बसला आहे आणि उर्वरित चार दिवसांचा खेळ होईल की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

आयसीसीनं या सामन्याच्या निकालासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवला असला तरी कसोटी सामन्याचा निकाल वन डे मॅचने लावावा लागेल अशीच चिन्हे सध्यातरी दिसत आहेत.

18 जून - इंग्लंडमधील हवामानाचा अंदाज लावणे अवघड आहे, विशेषतः वर्षांच्या या महिन्यांत. आज संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण असेल. अधूनमधून विजांचा कडकडाट होईल आणि पावसाची शक्यता आहे.

19 जून - शनिवारी दोन्ही संघांना मैदानावर उतरण्याची संधी हवामान देऊ शकतो. किंचित प्रमाणात पाऊस व वादळ येण्याची शक्यता आहे. पण, शुक्रवारपेक्षा त्याचे प्रमाण कमी असेल

20 जून - रविवारी दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सामन्यात व्यत्यय निर्माण होऊ शकतो. ताशी 22 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

21 जून - क्रिकेटसाठी उपयोगी हवामान सोमवारी पाहायला मिळेल. पाऊस नाही किंवा विजांचा कडकडाट नाही. पण, ढगाळ वातावरण असेल आणि ताशी 30 किमी वेगाने वारे वाहतील.

22 जून - पुन्हा पावसाचा खेळ

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!