India Vs Corona: 10 श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी 'या' सहा जणांनी अजूनही दाखवलेली नाही मनाची श्रीमंती

कोरोना व्हायरसशी संघर्ष करणाऱ्या देशवासियांच्या मदतीला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, गौतम गंभीर, इरफान व युसूफ पठाण हात पुढे केला आहे. पण, त्यांच्या कमाईच्या तुलनेत हा आकडा तुम्हाला फार थोडा वाटेल. चला जाणून घेऊया भारताच्या अव्वल दहा क्रिकेटपटूंची संपत्ती किती आणि त्यांनी किती मदत केली.

सौरव गांगुलीचे एकूण संपत्ती 99 कोटी इतके आहे. शिवाय त्याला बीसीसीआयकडून 6-7 कोटी पगार मिळतो आणि इंडियन सुपर लीगमधील अॅटलेटिको दी कोलकाता क्लबमध्ये त्याची भागीदारी आहे. गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारला कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी 50 लाख किमतीचे तांदुळ दिले आहेत.

गौतम गंभीरचे संपत्ती 101 कोटी आहे आणि तो भाजपाच्या तिकिटावर खासदारकीची निवडणुक जिंकला आहे. त्यानं खासरादरी निधीतून दिल्ली सरकारला 50 लाख रुपयांची मदत केली आहे.

रोहित शर्माची संपत्ती 124.8 कोटी आहे आणि सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या भारतीय क्रिकेटपूटंमध्ये तो आठव्या स्थानी आहे. कोरोना व्हायरसशी झगडण्यासाठी रोहितनं किती मदत केली हे अजूनही उघड झालेले नाही.

यूसुफ पठाणची संपत्ती 137.5 कोटी आहे आणि त्यानं त्याचा भाऊ इरफानसह कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी हॉस्पिटल्सना 4000 मास्कचे वाटप केले आहे.

युवराज सिंग 146 कोटींच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे. YouWeCan या संस्थेच्या माध्यामातून युवी कॅन्सरग्रस्तांसाठी नेहमी मदत करतो. पण, त्यानं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी किती मदत केली याची माहिती अद्याप नाही.

सुरेश रैनाची संपत्ती 150 कोटी आहे आणि त्यानेही कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी काही मदत केली, हे ऐकिवात नाही.

वीरेंद्र सेहवागची संपत्ती 255 कोटीच्या घरात आहे. त्यानं शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलून समाजकार्यात योगदान दिले आहे. पण, कोरोना व्हायरससाठी त्यानं किती योगदान दिले, याची माहिती नाही.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची संपत्ती 688 कोटींपेक्षाही अधिक आहे. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी त्याच्याकडून केवळ आवाहन केलं जात आहे. त्यानंही मदत केलीय की नाही याची माहिती नाही.

महेंद्रसिंग धोनीची संपत्ती 735 कोटींच्या घरात आहे. त्याने पुण्यातील गरजूंसाठी 1 लाखांची मदत केल्याचं वृत्त आहे.

सचिन तेंडुलकरची संपत्ती 1070 कोटी आहे आणि त्यानं 50 लाखांची मदत केली आहे.