20व्या वर्षी तिनं गाजवलं मैदान; टीम इंडियाच्या यष्टिरक्षकाची कमाल

भारताच्या महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक तानिया भाटियाचा आज 21वा वाढदिवस...

पंजाबची राजधानी चंडीगढ येथे तिचा जन्म झाला. तिचे वडील सेंट्रल बँकमध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहे.

वडिलांकडून तिला क्रिकेटचे बाळकडू मिळाले. तानियाचे वडील महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या संघात यष्टिरक्षक होते.

आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात तानियाचा समावेश करण्यात आला आहे.

शाळेत असताना तानियाला युवराज सिंगचे वडील योगराज सिंग आणि सुखविंदर बाबा यांच्याकडून पाच वर्ष क्रिकेटचे बारकावे शिकायला मिळाले.

तानियानं वयाच्या सातव्या वर्षांपासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 11 सप्टेंबर 2018मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

13 फेब्रुवारी 2018मध्ये तिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तिनं 3 वन डे आणि 25 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत.

तानियानं आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात तीन खेळाडूंना यष्टिचीत केले होते. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात तीन यष्टिचीत करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड तिनं नावावर केला.

महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात तीन यष्टिचीत करणारी ती दुसरी भारतीय यष्टिरक्षक ठरली. यापूर्वी 2012मध्ये सुरक्षणा नाईकनं श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

तानियानं ट्वेंटी-20त आतापर्यंत 22 खेळाडूंना यष्टिचीत केले आहे आणि महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ती या विक्रमात आघाडीवर आहे.