टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ; भारत दुसऱ्या क्रमांकावर

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेट संघांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. पाकिस्तानने आतापर्यंत एकूण २६७ सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी १५१ सामने जिंकले आहेत, तर १०५ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. चार सामने बरोबरीत सुटले, तर सात सामने अनिर्णित ठरले.

या क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने एकूण २४७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी १६४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ७१ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सर्वाधिक टी-२० सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी एकूण २३५ सामने खेळले असून, १२३ सामन्यांत विजय आणि ९५ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे.

वेस्ट इंडिजचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी एकूण २२८ सामने खेळले आहेत. यापैकी ९५ सामने जिंकले, तर ११९ सामन्यांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली.

ऑस्ट्रेलियाचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत २११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी ११९ सामन्यांत विजय मिळवला, तर ८५ सामन्यांत पराभव झाला आहे.