शिष्य असावा तर असा; व्हेंटिलेटरवर असलेल्या 'गुरू'साठी सौरव गांगुली धावला!

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याच्यातला देव माणूस या कठीण काळात सर्वांना दिसला.

कोरोना व्हायरसशी संघर्ष करण्यासाठी गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारच्या मदतीसाठी ईडन गार्डन खुलं केलं.

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्यांसाठी गांगुलीनं 50 लाख किमतीचे तांदुळ सरकारला दान केले.

कोलकाता येथील इस्कॉनच्या मदतीसाठीही गांगुलीनं पुढाकार घेतला. त्यानं दररोज 10000 लोकांच्या जेवणासाठी मदत केली.

बुधवारी गांगुलीचा आणखी एक पैलू जगासमोर आला. टीम इंडियाच्या या माजी कर्णधारानं आणखी एक लाखमोलाचं काम केलं आहे.

ज्यांचा हात पाकडून क्रिकेटचे धडे गिरवले त्या गुरूसाठी गांगुली धावला आहे. गांगुलीचे पहिले प्रशिक्षक अशोक मुस्तफी हे सध्या मृत्यूशी लढा देत आहेत.

अशोक मुस्तफी यांना बंगालचे रमाकांत आचरेकर म्हणून ओळखले जातात. गांगुलीनं गुरूच्या सर्व वैद्यकीय खर्चाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे.

मित्र संजय दास याच्याकडून गांगुलीला अशोक मुस्तफी यांच्या प्रकृतीची माहिती मिळाली.

अशोक मुस्तफी सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. अशोक येथे एकटेच राहतात आणि त्यांची मुलगी इंग्लंडमध्ये स्थायिक आहे.

गांगुलीला गुरू अशोक यांच्याबद्दल जेव्हा माहीत पडले, तेव्हा त्यानं त्वरीत हॉस्पिटलमध्ये फोन करून सर्व खर्च करणार असल्याचे सांगितले.