सारा तेंडुलकरच्या पाऊट फोटोवर शुभमन गिलने दिली अशी रिअ‍ॅक्शन, फॅन्स म्हणाले...

Published: June 12, 2021 04:01 PM2021-06-12T16:01:33+5:302021-06-12T16:08:12+5:30

Shubhaman Gill & Sara Tendulkar: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याचे नाव काही दिवसांपासून सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी जोडले जात होते. मात्र शुभमन गिलने यावर प्रतिक्रिया देताना आपण सिंगल असल्याचे सांगितले होते.

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शुभमन गिल याचे नाव काही दिवसांपासून सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी जोडले जात होते. मात्र शुभमन गिलने यावर प्रतिक्रिया देताना आपण सिंगल असल्याचे सांगितले होते.

शुभमनच्या स्पष्टीकरणानंतर काही काळ ही चर्चा थांबली असली तरी आता पुन्हा एकदा सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचं नाव एकमेकांशी जोडलं जाऊ लागलं आहे. साराच्या लेटेस्ट फोटोवर शुभमन गिलने दिलेल्या रिअ‍ॅक्शन हे त्यामागचं कारण ठरले आहेत.

साराने इन्स्टाग्रामवर आपल्या तीन मूडची एक रील शेअर केली होती. त्याला सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या शुभमन गिलने लाईक केले. तेव्हापासून फॅन्सनी दोघांचेही नाव पुन्हा जोडण्यास सुरुवात केली आहे.

साराच्या या पोस्टवर अलाविया जाफरी हिने कमेंट करून ही क्वारेंटाइन डायरी आहे का, असा सवाल विचारला आहे. तर सारा ही सध्या इंग्लंडमध्ये आहे, असा काही युझरचा दावा आहे.

साराच्या पोस्टवरून शुभमन गिल युझरच्या निशाण्यावर आले आहे. युझरने त्यांना पोस्ट टॅग करण्यास सुरुवात केली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!