चोरी पकडली; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराच्या पत्नीवर लाईन मारतोय शेन वॉर्न?

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न मैदानावरील कामगिरीबरोबरच अनेक महिलांशी असलेल्या संबंधांमुळेही अनेकदा चर्चेत आला आहे. आता पुन्हा एका त्याचं नाव एका महिलेशी जोडलं जात आहे.

पण, यावेळी शेन वॉर्न त्याचा माजी संघसहकारी आणि जीगरी यार याच्या पत्नीवर लाईन मारत असल्याचे चित्र समोर येत आहे. सोशल मीडियावरील त्याच्या कृतीमुळे तशा चर्चांनाही जोर धरू लागला आहे.

1 सप्टेंबर 1995मध्ये शेन वॉर्ननं सिमॉन कॅल्लाहन हिच्याशी विवाह केला. 10 वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. शेन वॉर्नचे अनेक महिलांशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे कॅल्लाहन वैतागली होती. या दोघांनी तीन मुलं आहेत.

त्यानंतर 2010मध्ये शेन वॉर्न आणि हॉलिवूड अभिनेत्री एलिजाबेथ हर्ली हिच्याशी त्याचं नाव जोडलं गेलं. या दोघांना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करताना अनेकदा पाहिलं गेलं होतं.

वॉर्न आणि एलिजाबेथ यांचं प्रेम प्रकरण 2010मध्ये सुरू झालं. त्यानं सर्वांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2011मध्ये त्यांनी साखरपुडा केला. पण, दोन वर्षांनंतर त्यानी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सेक्स स्कँडलमुळे त्याचं पहिलं लग्न तुटलं आणि त्याला ऑस्ट्रेलियन संघाचे उप कर्णधारपदही गमवावे लागले. 2000मध्ये त्याचं ब्रिटिश नर्ससोबत अनैतिक संबंध उघड झाले. 2005मध्ये त्याचं एका तीन मुलांच्या आईशी संबंध असल्याची चर्चा रंगली होती.

आता शेन वॉर्न पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी त्याचं नाव मायकेल क्लार्कची माजी पत्नी कायली क्लार्क हिच्याशी जोडलं जात आहे.

मायकेल क्लार्क आणि कायली यांचा यांनी फेब्रुवारी 2020मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता कायलीच्या प्रत्येक फोटोला वॉर्न लाईक करत आहे.

मायकेल आणि कायली यांच्यात 2018पासून वाद सुरू झाला. मायकेल आणि त्याच्या असिस्टंटचं अफेअर असल्याची चर्चा रंगली होती. साशा आणि मायकेल यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

वॉर्ननं ऑस्ट्रेलियासाठी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1001 विकेट्स घेतले आहेत.