Happy Anniversary: क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर प्रेमाच्या सामन्यातही संजू सॅमसनला पाहावी लागली पाच वर्ष वाट!

महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघात यष्टिरक्षक म्हणून नेमकी कोणाला संधी मिळायला हवी, ही न थांबणारी चर्चा आहे. इंडियन प्रीमिअर लीग आणि स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही संजू सॅमसन ( Sanju Samson) याच्याकडे निवड समितीनं काणा डोळाच केला...

२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त पदार्पण करणाऱ्या संजूला पाच वर्षांत केवळ ७ ट्वेंटी-20 सामने खेळण्याची संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला खेळवले, परंतु त्याला प्रभाव पाडता आला नाही. क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर संजू सॅमसनला प्रेमाच्या सामन्यातही पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागली.

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज संजूच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. केरळच्या या खेळाडूनं पत्नी चारुलताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

थिरुअनंतपुरम येथील Mar Ivanios College येथे या दोघांची भेट झाली. कॉलेजमध्ये या दोघांची प्रेमकहाणी प्रसिद्ध होती. २२ डिसेंबर २०१८ मध्ये दोघांचा विवाह झाला.

संजू आणि चारुलता यांची पहिली भेट कॉलेजमध्येच झाली. संजूनं चारूलताला प्रपोज केले. पण त्याला उत्तर मिळायला तब्बल पाच वर्षे लागली.

पाच वर्षांनंतर या दोघांनी आपली ही प्रेमकहाणी सर्वांसमोर आणली. या दोघांनी आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली.

प्रेमाची कबुली दिल्यावर या दोघांनी आपल्या कुटुंबियांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांचा साखरपुडा पार पडला.

संजूनला आयपीएल २०२०मध्ये राजस्थान रॉयल्सनं ८ कोटी रक्कम मोजून संघात कायम राखले. त्यानं १४ सामन्यांत ३७५ धावा कुटल्या.