'रांचीचं पोरगं म्हणून मैदानात उतरला, Legend बनून परतला'

देशात ७४ वा स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या सावटाखालीही मर्यादेत आणि उत्साहात संपन्न झाला. देशवासीय स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहातून बाहेर येत असतानाच भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीचे वृत्त येऊन धडकले.

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या अचानक आलेल्या निवृत्त वृत्तामुळे देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. निवृत्तीचा मोठा निर्णय जाहीर केला. पण, धोनीनं मैदानात निवृत्त व्हावं, अशी चाहत्यांची इच्छा होती.

धोनीने इंस्ट्रग्रामवरुन आपली निवृत्ती जाहीर केली. ''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीचं ही पोस्ट बरीच बोलकी आहे.

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे.

याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीय.

वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.

धोनी केवळ सर्वसामान्यांसाठी हिरो नव्हता, तर राजकारणातील दिग्गजांसाठीही तो आवडता खेळाडू होता. म्हणूनच धोनीच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनीही धोनीला शुभेच्छा दिल्या असून धोनीच्या खेळीने लक्षावधी लोकांची मनं जिंकल्याच त्यांनी म्हटलंय

महिला टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजनेही ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

धोनीने कर्णधार म्हणून, सैन्यातील ऑफिसर बनून आणि सर्वात महत्त्वाचं एक माणूस बनून देशावासियांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय

तमिळनाडूचे मुख्यमंत्री इडापड्डी पलानीसामी यांनीही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच भारतीय क्रिकेटचा नेता म्हणून तू इतिहास रचल्याचंही ते म्हणाले.

अनिरुद्ध चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक आठवण शेअर केली होती. धोनीने हेलिकॉप्टरच्या उड्डाणाप्रमाणं उंची गाठलीय, पण आजही त्याचे पाय जमिनीवरच आहेत.

सन 2011 च्या विश्वचषक सामन्यावेळी कर्णधार असतानाही सराव सामन्यात धोनीचे चक्क खेळाडूंसाठी पाणी आणण्याचं काम केलं होतं.

धोनीच्या या स्वभावामुळेच तो चाहत्यांंसाठी खास होता, तो केवळ क्रिकेटचा लिजेंट नसून मानवतेचाही लिजंड असल्याचं धोनीनं दाखवून दिलं होतं.

महेंद्रसिंह धोनी 2003 साली मैदानात उतरला तेव्हा रांचीचा मुलगा म्हणून, पण 2020 साली तो मैदानातून परतला तो लिंजेंड बनून.

धोनीने निवृत्तीसाठी 7.29 मिनिटांचीच वेळ का निवडली हे, सांगणारा हा फोटो

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी धोनीचा फोटो शेअर करत धोनीबद्दल लिहिलं आहे. धोनी लिजेंड बनून परततोय, असं त्यांनी म्हटलंय.

राज्यमंत्री सतेज पाटील यांनीही धोनीला शुभेच्छा देत, भावा, तुझा नादच खुळा... असं कॅप्शन दिलंय.