क्रिकेटच्या मैदानात 360 डिग्रीमध्ये मारले फक्त या पाच फलंदाजानींच फटके

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए बी डी'व्हिलियर्सची फलंदाजी साऱ्यांनाच आवडायची. कारण त्याचे प्रत्येक फटके हे नजरेचे पारणे फेडायचे. क्रिकेटच्या मैदानात 360 डिग्रीमध्ये त्याने फटके मारलेले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या फलंदाजीचा धसका प्रत्येक गोलंदाज घेत असतो. कारण एकहाती सामना फिरवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर मैदानात कुठेही तो फटके मारू शकतो.

जो रूट : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे इंग्लंडचा जो रूट. सध्याच्या क्रिकेट विश्वात रूटने नाव आदराने घेतले जाते. रुटने मैदानातील सर्व ठिकाणी फटके मारण्याचा पराक्रम केला आहे.

महेला जयवर्धने : श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने एक काळ चांगलाच गाजवला होता. आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने संघाला बरेच विजय मिळवून दिले होते. मैदानातील कोणत्याही ठिकाणी तो फटके मारायचा.

ब्रेंडन मॅक्युलम : न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने देशाकडून बरेच विक्रम केले आहेत. प्रत्येक क्रिकेटच्या प्रकारात ब्रेंडन मॅक्युलमने आपील छाप पाडली आहे. मैदानात सर्वत्र फटके मारण्यामध्येही त्याचे नाव क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध आहे.