न्यूझीलंडच्या मानगुटीवर 'Super Over'चं भूत; पाहा कधी व कोणी केलं पराभूत

न्यूझीलंडचा हा सुपर ओव्हरमधील एकूण सातवा पराभव ठरला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. उर्वरीत सहा पराभव हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यातील आहेत.

2008 - पराभूत वि. वेस्ट इंडिज ( न्यूझीलंड - 7 बाद 155 बरोबरी वि. विंडीज 8 बाद 155; सुपर ओव्हरमध्ये विंडीजनं 1 बाद 25 धावा, प्रत्युत्तरात न्यूझीलंड 2 बाद 15)

2012 - पराभूत वि. श्रीलंका ( न्यूझीलंड - 7 बाद 174 बरोबरी वि. श्रीलंका - 6 बाद 174; सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या 1 बाद 13 धावा, प्रत्युत्तरात न्यूझीलंड 1 बाद 7 धावा)

2012 - पराभूत वि. वेस्ट इंडिज ( वेस्ट इंडिज - 139 बरोबरी वि. न्यूझीलंड - 7 बाद 139; सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंड 17 धावा, प्रत्युत्तरात विंडीजकडून ख्रिस गेलनं अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून विजय मिळवला)

2019 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना ( न्यूझीलंड - 8 बाद 241 बरोबरी वि. इंग्लंड 241; सुपर ओव्हरमध्ये न्युझीलंड 15 धावा, प्रत्युत्तरात इंग्लंड 15 धावा ; सर्वाधिक चौकाराच्या नियमानुसार इंग्लंड विजयी)

2019 - पराभूत वि. इंग्लंड ( न्यूझीलंड - 5 बाद 146 बरोबरी वि. इंग्लंड - 7 बाद 146; सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड 17 धावा, प्रत्युत्तरात न्यूझीलंड 1 बाद 8 धावा)

2020 - पराभूत वि. भारत ( भारत - 5 बाद 179 बरोबरी वि. न्यूझीलंड - 6 बाद 176; सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंड 17 धावा, प्रत्युत्तरात भारत 20 धावा)

2020 - पराभूत वि. भारत ( भारत - 8 बाद 165 बरोबरी वि. न्यूझीलंड - 7 बाद 165; सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंड 13 धावा, प्रत्युत्तरात भारत 14 धावा)