International Womens Day : वन डेतील पहिले वैयक्तिक द्विशतक ते अनेक विक्रम; मुंबई इंडियन्सकडून महिला क्रिकेटपटूंना मानाचा मुजरा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या ( International Womens Day) निमित्तानं मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) महिला क्रिकेटपटूंच्या अचंबित करणाऱ्या विक्रमांना उजाळा दिला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ( Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात द्विशतक झळकावण्याच्या पहिल्या पुरुष क्रिकेटपटूचा मान पटकावला, पण १३ वर्षांपूर्वी एका महिला क्रिकेटपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले वहिले द्विशतक झळकावले होते.

१९७३ मध्ये पहिलावहिला वर्ल़्ड कप खेळवण्यात आला.

ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कनं आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात द्विशतक झळकावण्याचा पहिला मान पटकावला. तिनं १९९७मध्ये डेन्मार्कविरुद्ध २२९ धावा चोपल्या.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण करण्याचा पहिला मान वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदनं पटकावला

न्यूझीलंडच्या सूझी बेट्सनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वप्रथम ३००० धावा कुटल्या.

ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या नावावर सर्वाधिक वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम आहे

भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळण्याचा पहिला मान हरमनप्रीत कौरनं पटकावला

१६ वर्ष व २०५ दिवसांची असताना मिताली राजनं वन डेत शतक झळकावलं. शतक झळकावणारी ती युवा फलंदाज आहे