MS Dhoni Retirement: माहीच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण, ज्यांनी धोनीला बनवले चॅम्पियन कॅप्टन

MS Dhoni Retirement: धोनीने आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. मात्र या काळात धोनीच्या कारकिर्दीत असे काही क्षण आले ज्यांनी त्याला क्रिकेटमधला चॅम्पियन कॅफ्टन बनवले. त्याच क्षणांचा घेतलेला हा आढावा.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, धडाकेबाज फलंदाज आणि चपळ यष्टीरक्षक असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. माहीने अचानक केलेल्या निवृत्तीच्या घोषणेमुळे क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे.

धोनीने आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. मात्र या काळात धोनीच्या कारकिर्दीत असे काही क्षण आले ज्यांनी त्याला क्रिकेटमधला चॅम्पियन कॅफ्टन बनवले. त्याच क्षणांचा घेतलेला हा आढावा.

टी-२० विश्वचषक २००७ - Marathi News | टी-२० विश्वचषक २००७ | Latest cricket Photos at Lokmat.com

२००७ मध्ये दक्षित आफ्रिकेत झालेल्या टी-२० विश्वचषकासाठी दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत निवडण्यात आलेल्या युवा संघाच्या कर्णधारपदी धोनीची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत कुशल कप्तानीचे प्रदर्शन घडवत धोनीने भारताला पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकून दिला. तिथूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका चॅम्पियन कर्णधाराचे आगमन झाल्याची चाहूल जगाला लागली.

 आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ - Marathi News | आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ | Latest cricket Photos at Lokmat.com

२००७ ते २०११ या चार वर्षांच्या काळात धोनीने भारतीय क्रिकेट संघाला अनेक स्पर्धा जिंकून दिल्या. दरम्यान, २०११ मध्ये भारतात झालेला क्रिकेट विश्वचषक हा भारतीय क्रिकेटप्रेमी आणि स्वत: धोनीसाठीही अविस्मरणीय ठरला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत श्रीलंकेला पराभूत करून धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने २८ वर्षांनंतर पुन्हा जगज्जेते होण्याचा मान पटकावला.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी - Marathi News | आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी | Latest cricket Photos at Lokmat.com

२०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा धोनीसाठी आयसीसी विजेतेपदांची हॅटट्रिक नोंदवून देणारी ठरली. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत अपराजित राहत विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत भारताने यजमान इंग्लंडचा पराभव केला.

आयपीएल विजेतेपदे (२०१०, २०११ आणि २०१८) - Marathi News | आयपीएल विजेतेपदे (२०१०, २०११ आणि २०१८) | Latest cricket Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच धोनीने भारतातील आयपीएलचे मैदानही गाजवले. धोनीचा संघ हा आयपीएलमध्ये नेहमीच आघाडीच्या संघांपैकी एक राहिला आहे. धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने २०१०, २०११ आणि २०१८ अशा तीनवेळा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला आहे.

 चॅम्पियन्स लीग टी-२० (२०१० आणि २०१४) - Marathi News | चॅम्पियन्स लीग टी-२० (२०१० आणि २०१४) | Latest cricket Photos at Lokmat.com

आयपीलएलप्रमाणेच चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेतही धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचा बोलबाला राहिली. धोनीच्या नेतृ्त्वाखाली सीएसकेने २०१० आणि २०१४ मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ अव्वस्थानी - Marathi News | कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ अव्वस्थानी | Latest cricket Photos at Lokmat.com

केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच नाही तर कसोटी क्रिकेटमध्येही धोनीच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली. धोनीने भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर वर्षभरातच भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थान पटकावले. त्यानंतर भारतीय संघ दीर्घकाळापर्यंत कसोटी संघाच्या अव्वलस्थानावर राहिला.

धोनीच्या कारकिर्दीवर एक नजर - Marathi News | धोनीच्या कारकिर्दीवर एक नजर | Latest cricket Photos at Lokmat.com

धोनीने 90 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. तर 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 50.57 च्या धडाकेबाज सरासरीने 10 हजार 773 धावा फटकावल्या. त्यामध्ये 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. तर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये माहीने 98 सामन्यांत 1617 धावा केल्या.