दूध, चिकन, पास्ता, बटर... टीम इंडियाचा आहार बघाल तर हैराण व्हाल..

कसोटी सामना सुरु झाल्यावर खेळाडूंना दोन ब्रेक मिळतात. सामना सुरु झाल्यावर दोन तासांनंतर लंच ब्रेक होतो. त्यानंतर दुसरे सत्र संपल्यावर टी ब्रेक होतो.

सामना सुरु होण्यापूर्वीचा खेळाडूंचा आहार महत्वाचा समजला जातो.

सामना सुरु होण्यापूर्वी खेळाडू दूध, चिकन, पास्ता, पीनट बटर, जॅम आणि सँडविच खातात.

लंच ब्रेकमध्ये खेळाडूंना रोटी, हिरवी भाजी, डाळ आणि बटाटे खायला देतात. त्याचबरोबर ज्यांना मांसाहार करायचा आहे, ते चिकन, मटण आणि माश्यांवर ताव मारतात.

काही वेळा खेळाडू प्रोटीन बार्स खातात. त्याचबरोबर काही वेळा फिळं किंवा आईसक्रीम खाण्यावर भर देतात.

आपल्या आहारामध्ये फॅट आणि कार्बोहाइड्रेट जास्त असावेत, हा खेळाडूचा उद्देश असतो.

लंचच्या दोन तासांनंतर पुन्हा एकदा टी ब्रेक होतो.

मैदानात जाऊन नेमकी काय कामगिरी करायची आहे, यावर खेळाडूंचा आहार अवलंबून असतो, असे माजी यष्टीरक्षक नयन मोंगियाने सांगितले होते.

टी ब्रेकमध्ये खेळाडू जे पचायला हलके पदार्थ असतात ते सेवन करण्यावर भर देतात. बऱ्याचदा खेळाडू कॉफीचे सेवन करतात, त्याचबरोबर काही तरी हलके-फुलके खातात.

दिवसाचा खेळ संपल्यावर खेळाडू मनाला आवडतात ते पदार्थ खात नाहीत. डीनरमध्ये खेळाडू एनर्जी देणारे पदार्थ सेवन करतात.