मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो

मुंबई इंडियन्सचा सदस्य आणि दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार क्विंटन डी कॉक याच्या लग्नाचा आज वाढदिवस...

मुंबई इंडियन्सने संघातील सदस्याला आणि त्याची पत्नी साशा हर्ली यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

19 सप्टेंबर 2016 मध्ये क्विंटन आणि साशा यांचा विवाह मॉरिशियस येथील व्हिक्टोरिया येथे झाला. त्यांच्या लग्नाला आफ्रिकन संघातील सर्वच खेळाडू उपस्थित होते.

डी कॉक आणि साशा यांनी चार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 स्पर्धेतील हायव्हेल्ड लायन्स ( डी कॉक तेव्हा प्रतिनिधित्व करत असलेला संघ) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात डी कॉक व साशा यांची पहिली भेट झाली.

या सामन्यायत साशा चिअरलिडर म्हणून होती. त्या सामन्यातील डी कॉकच्या खेळीनं साशाला प्रभावित केले. त्यामुळेच सामना संपल्यानंतर ती डी कॉकचे अभिनंदन करण्यासाठी गेली आणि तेथेच दोघांची पहिली भेट झाली.

क्विंटन डी कॉकने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत, तर 2013मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वन डे आणि 2012मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये डी कॉकने 50 सामन्यांत 30.33च्या सरासरीनं 1456 धावा केल्या आहेत. त्यात 10 अर्धशतकांचा व एका शतकाचा समावेश आहे. डी कॉकने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 108 धावांची खेळी केली होती.