IPL 2021 Suspended : डेव्हिड वॉर्नरचा तळतळाट लागला अन् लीग करावी लागली स्थगित, पाहा भन्नाट मीम्स

IPL 2021 Suspended : बीसीसीआयनं आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण, नेटिझन्स सुसाट सुटले आहेत आणि त्यांनी डेव्हिड वॉर्नरचा तळतळाट लागला, अशा आशयाचे मीम्स व्हायरल केले आहेत. सनरायझर्स हैदराबादनं ६ सामन्यांत १ विजय मिळवल्यानंतर वॉर्नरकडून नेतृत्व काढून घेतले आणि केन विलियम्सनला कॅप्टन बनवले. त्यानंतर वॉर्नरला अंतिम ११मधूनही बाहेर केले गेले.