कृणाल पांड्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, पदार्पणात १४ भारतीय खेळाडूंनी केल्या ५०+ धावा, पण लोकेश राहुल ठरला सरस

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या ( India all-rounder Krunal Pandya) यानं मंगळवारी टीम इंडियाच्या वन डे संघात पदार्पण केलं. कृणालनं ३१ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली. त्यानं २६ चेंडूंत अर्धशतक झळकावून वन डे पदार्पणातील जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. ( Indian Players who scored 50+ runs in ODI debut)

साबा करिम - ५५ धावा ( वि. दक्षिण आफ्रिका, १९९७)

फैज फझल - ५५ धावा ( वि. झिम्बाब्वे, २०१६)

प्रविण आमरे - ५५ धावा ( वि. दक्षिण आफ्रिका, १९९१)

अमय खुरासिया - ५७ धावा ( वि. श्रीलंका, १९९९)

कृणाल पांड्या - ५८ धावा ( वि. इंग्लंड, २०२१)

रवींद्र जडेजा - ६० धावा ( वि. श्रीलंका, २००९)

अंबाती रायुडू - ६३ धावा ( वि. झिम्बाब्वे, २०१३)

संदीप पाटील - ६४ धावा ( वि. ऑस्ट्रेलिया, १९८०)

रमण लांबा - ६४ धावा ( वि. ऑस्ट्रेलिया, १९८६)

अजित वाडेकर - ६७ धावा ( वि. इंग्लंड, १९७४)

मनिष पांडे - ७१ धावा ( वि. झिम्बाब्वे, २०१५)

नवज्योत सिधू - ७३ धावा ( वि. ऑस्ट्रेलिया, १९८७)

ब्रिजेश पटेल - ८२ धावा ( वि. इंग्लंड, १९७४)

रॉबिन उथप्पा - ८६ धावा ( वि. इंग्लंड, २००६)

लोकेश राहुल - १०० धावा ( वि. झिम्बाब्वे, २०१६)