Photos : पाहा कसं आहे जगातील सर्वात मोठं सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअम

India vs England : सरावासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूनं स्टेडिअम पाहून व्यक्त केलं आश्चर्य

भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील मोटेरा येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. ( सर्व फोटो - चेतेश्वर पुजारा, क्रिकेट इंग्लंड, स्टुअर्ट ब्रॉड, केविन पीटरसन)

मोटेरा येथे असलेलं सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडिअम आहे.

या स्टेडियमवर यापूर्वीही सामने खेळवण्यातआले आहेत. परंतु गुजरात क्रिकेट असोसिएशननं या स्टेडियमला आता नवा लूक दिला आहे. तसंच यानंतर हे जगातील सर्वात मोठं स्टेडिअम बनलं आहे.

मोटेरा येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअममध्ये तब्बल एका वेळी १ लाख १० हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले असताना हे स्टेडिअम चर्चेत आलं होते. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यानं या स्टेडिअमचा दौरा केला होता.

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांनी एअरपोर्ट ते स्टेडिअम पर्यंत असा २२ किलोमीटरचा रोड शो केला होता. या स्टेडिअमवर मोदींनी अधिकृतरित्या ट्रम्प यांचं स्वागत केलं होतं.

यापूर्वी अहमदाबाद मिररनं दिलेल्या वृत्तानुसार या स्टेडिअमच्या उभारणीसाठी तब्बल ८०० कोटी रूपयांचा खर्च आला आहे.

या ठिकाणी चार लॉकर रूम्स आहेत. तसंच आयपीएलमध्ये एका दिवशी होणाऱ्या दोन सामन्यांकडे पाहता हे स्टेडिअम तयार करण्यात आलं आहे.

मुख्य क्रिकेट ग्राऊंडव्यतिरिक्त या ठिकाणी दोन छोटी क्रिकेट ग्राऊंडही आहेत. या स्टेडिअममध्ये एकूण ११ पिचदेखील आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडिअममध्ये एकूण ७५ कॉर्पोरेट बॉक्स आहेत आणि एका कॉर्पोरेट बॉक्सची क्षमता २५ इतकी आहे.

पार्किगच्या बाबतीतही या स्टेडिअममध्ये कोणतीही कसर सोडण्यात आलेली नाही. १० हजार बाईक्स आणि ३ हजार कार पार्क करण्याची क्षमता या ठिकाणी आहे.

स्टेडिअमच्या क्लबहाऊसमध्ये ५५ खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये इनडोअर आणि आऊटडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी, रेस्टॉरंट, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, जिम, पार्टी एरियादेखील आहे.

या स्टेडिअममध्ये केवल क्रिकेटच्याच सुविधा नाहीत. तर या ठिकाणी फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग, टेनिस, रनिंग ट्रॅक आदि अकादमींचीदेखील व्यवस्था आहे.

हे स्टेडिअम १९८२ मध्ये उभारण्यात आलं होतं. परंतु आता या स्टेडिअमला नवा लूक देण्यात आला असून प्रेक्षकांच्या बैठकीची संख्याही वाढवण्यात आली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानावर आलेल्या सर्वच खेळाडूंनी या स्टेडिअमची आणि या ठिकाणच्या सुविधांचं कौतुकही केलंय.

Read in English