IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...

Ricky Ponting slams Pakistan Cricket IND vs PAK Asia Cup 2025: एक अशी घटना घडली की रिकी पॉन्टींगला वादावर बोलावेच लागले.

भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध सहज विजय मिळवला. या सामन्याआधी आणि नंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकशी हस्तांदोलन टाळले.

पाक क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी कर्णधार भारतीय ड्रेसिंग रुमपर्यंत आला पण भारतीय खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला आणि आपला नकार स्पष्टपणे दर्शवला.

हस्तांदोलन वादाच्या या घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. याचदरम्यान, एक अशी घटना घडली की रिकी पॉन्टींगला वादावर बोलावेच लागले.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि पंजाब किंग्जचा हेड कोच रिकी पॉन्टींग याने भारतीय संघाला 'लूजर' म्हटल्याचे पसवले जात होते. पण पॉन्टींगने हे साफ नाकारत पाकिस्तानला झापले.

सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता की, रिकी पॉन्टिंगने 'स्काय स्पोर्ट्स' वर म्हटले आहे की, हा सामना नेहमीच लक्षात ठेवला जाईल, कारण यात भारत 'लूजर' सिद्ध झालाय.

पुढे असाही दावा केला आहे की, पाकिस्तानी संघाने शेवटी हस्तांदोलन करण्याची इच्छा व्यक्त करून 'खेळभावनेने' स्वत:ला खरा विजेता असल्याचे सिद्ध केले. पॉन्टींगने दावा खोडून काढला.

पॉन्टींगने एक्सवर पोस्ट करत म्हटले, "सोशल मीडियावर माझ्या नावाने काही टिप्पण्या केल्या जात आहेत याची मला माहिती आहे. मी असे विधान केलेले नाही."

पुढे पॉन्टींगने पाकिस्तानी चाहत्यांना झापत आणखी एक गोष्ट स्पष्ट केली की, मी आशिया कपबाबत कोणतीही सार्वजनिक टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे आता पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे.