IND vs NZ: 'रहाणे भाग्यवान, त्याला अजूनही संघात राहण्याची संधी मिळतेय'; गौतम गंभीरनं साधला निशाणा

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पार पडणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व (Team India) अजिंक्य रहाणे करणार आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) निशाणा साधला आहे.

IND vs NZ Test Series: भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याला (India Vs New Zealand Test Cricket) २५ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. परंतु या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) अजिंक्य रहाणेवर निशाणा साधलाय.

"अजिंक्य रहाणे हा भाग्यवान आहे की त्याला आतापर्यंत संघात टिकून राहण्याची संधी मिळतेय. तसंच त्याला संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळतेय," असं म्हणत गौतम गंभीरनं त्याच्यावर निशाणा साधला.

तर दुसरीकडे इरफान पठाणनेही अजिंक्य रहाणेवर वक्तव्य केलं. "या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर सर्वांच लक्ष असेल. त्याला उत्तम कामगिरी करावी लागेल. रहाणे वर्षभरापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे," असं इरफान म्हणाला.

रोहितच्या जागी मयंक अग्रवाल किंवा केएल राहुल सोबत भारतीय संघानं सुरूवात केली पाहिजे. राहुलनं इंग्लंडविरोधातही सुरूवात केली होती. याशिवाय शुभमन गिलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला आवडेल, असं गंभीरनं स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह शोदरम्यान सांगितलं.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे म्हणणे आहे की या प्रशिक्षण केंद्रांमध्ये सिम्युलेटर आणि उमेदवारांना उच्च-गुणवत्तेचे प्रशिक्षण देण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक देण्यात येतील.

भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. अशात संघाचं कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.

दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीदेखील सहभागी होईल. सर्वांचं लक्ष हे अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर असणार आहे आणि तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा असल्याचं यावेळी इरफान म्हणाला.

विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व असेल. दोन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा खेळणार नसल्याने मधल्या फळीत गिलला फलंदाजीची संधी देत त्याच्या खेळातील कौशल्य तपासले जाईल. शानदार लयीमध्ये असलेला लोकेश राहुल हा मयंक अग्रवालसोबत सलामीला येणार आहे.

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचे मत असे की, कोहलीशिवाय मधल्या फळीत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणू शकेल, असा किमान एक फलंदाज असावा, असे व्यवस्थापनाला वाटते. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांची शैली जवळपास सारखी आहे.

न्यूझीलंडविरुद्ध ऋद्धिमान साहा मुख्य यष्टिरक्षक आहे. ऋषभ पंतच्या तुलनेत तो बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो. रोहित, कोहली आणि पंतच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत फलंदाजीसाठी आक्रमक खेळाडूची गरज भासेल.

अशावेळी गिल उपयुक्त ठरतो. अनेक फटके मारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. नव्या चेंडूवर त्याला धावा काढणे जमते. याविषयी विचारताच परांजपे पुढे म्हणाले, ‘राहुलने कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत धावा काढल्या आहेत. शुभमन हा कित्ता गिरवू शकतो.

युवा फलंदाज या नात्याने गरजेनुसार तो खेळ करू शकेल. गिल मधल्या फळीत यशस्वी ठरल्यास कोहली आणि रोहित यांच्या पुनरागमनामुळे पुजारा आणि रहाणे यांच्यावर चांगल्या कामगिरीसाठी दडपण वाढत जाईल.

निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यर याला मधल्या फळीतील तज्ज्ञ फलंदाज म्हणून निवडले आहे, मात्र मुंबईच्या श्रेयसला कसोटी पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल. परांजपे यांच्या मते, काही काळानंतर श्रेयसला संधी मिळू शकेल. पुजारा आणि रहाणे यांच्यानंतर विहारी, शुभमन, श्रेयस यांच्यातच मधल्या फळीसाठी मोठी चढाओढ असेल.’