World Test Championship : पाकिस्तानच्या बाबर आझमची सरशी; विराट कोहलीवर कुरघोडी

इंग्लंड- वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडनं कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आणि आता पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला. आंतरराष्ट्रीय कसोटीला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा एकदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिका अन् सर्वाधिक धावा, विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा बाबर आझम यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर कुरघोडी केली आहे. शिवाय त्याची फलंदाजी सरासरी ही अव्वल दहा फलंदाजांपेक्षाही अधिक आहे. चला जाणून घेऊया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील टॉप टेन फलंदाज..

1 ) मार्नस लॅबुशेन ( ऑस्ट्रेलिया) 9 सामने, 1249 धावा, 83.26 सरासरी, 100/50 - 4/7

2) बेन स्टोक्स ( इंग्लंड) 13 सामने, 1131 धावा, 53.85 सरासरी, 100/50 - 4/4

3) स्टीव्ह स्मिथ ( ऑस्ट्रेलिया) 9 सामने, 1028 धावा, 73.42 सरासरी, 100/50 - 3/5

4) डेव्हिड वॉर्नर ( ऑस्ट्रेलिया) 10 सामने, 881 धावा, 55.06 सरासरी, 100/50 - 3/1

5) जो रूट ( इंग्लंड) 12 सामने, 828 धावा, 37.63 सरासरी, 100/50 - 0/8

6) मयांक अग्रवाल ( भारत) 9 सामने, 779 धावा, 55.64 सरासरी, 100/50 - 3/2

7) रोरी बर्न्स ( इंग्लंड) 10 सामने, 731 धावा, 38.47 सरासरी, 100/50 - 1/5

8) अजिंक्य रहाणे ( भारत) 9 सामने, 715 धावा, 59.58 सरासरी, 100/50 - 2/5

9) बाबर आझम ( पाकिस्तान) 6 सामने, 689 धावा, 86.12 सरासरी, 100/50 -4/3

10) विराट कोहली ( भारत) 9 सामने, 627 धावा, 52.25 सरासरी, 100/50 - 2/2