HBD Smriti Mandhana: 'नॅशनल क्रश' स्मृती मानधनाला भावामुळे लागलं क्रिकेटचं वेड; राहुल द्रविडच्या बॅटने झळकावलं द्विशतक!

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा ( Happy Birthday Smriti Mandhana) आज २५ वा वाढदिवस आहे.

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा ( Happy Birthday Smriti Mandhana) आज २५ वा वाढदिवस आहे. भाऊ आणि वडिलांना क्रिकेट खेळताना पाहून स्मृतीनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 9 व्या वर्षीच तिची महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील संघात निवड झाली होती. (Smriti Mandhana Instagram)

स्मृती मंधानानं ऑक्टोबर २०१३ मध्ये १९ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत १५० चेंडूंत नाबाद २२४ धावा चोपल्या होत्या. वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू होती. स्मृतीने १७व्या वर्षी हा मोठा पराक्रम केला.

२०१३मध्येच तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१६च्या आयसीसी महिला संघात स्थान पटकावणारी ती एकमेव भारतीय खेळाडू होती आणि २०१८मध्ये तिला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.

२०१७चा वन डे वर्ल्ड कप आणि २०२०चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संघाला फायनलपर्यंत प्रवेश मिळवून देण्यात स्मृतीचे मोलाचे योगदान होते.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या महिला बिग बॅश लीगमध्ये खेळली आहे. तसेच इंग्लंडमध्ये होणाऱ्या ‘दि हंड्रेड’ या लीगसाठी देखील तिची निवड झाली आहे.

स्मृती मंधानानं ५९ वन-डे २२५३ धावा केल्या असून त्यात ४ शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे. ८१ ट्वेंटी-२० सामन्यांत तिच्या नावावर १९०१ धावा आहेत. त्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे. तिने ३ टेस्टमध्ये दोन अर्धशतकं झळकावली आहेत.

२०१३ मध्ये स्मृतीनं झळकावलेलं द्विशतक हे राहुल द्रविड याच्या बॅटीतून आलं होतं. स्मृतीचा भाऊ श्रवण यानं बँगळुरू येथे असताना राहुल द्रविड यांना त्यांची बॅट देण्याची विनंती केली होती. द्रविडनंही त्यावर स्वाक्षरी करून ती दिलीही... श्रवणनं स्मृतीसाठी ती बॅट मिळवली आणि त्याच बॅटीनं तिनं द्विशतक झळकावलं होतं. स्मृतीनं स्वतः हा किस्सा सांगितला.

Read in English