ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूच्या फोनमध्ये मिळाले लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ, पोलिसांनी केले अटक

Published: May 18, 2021 12:00 PM2021-05-18T12:00:50+5:302021-05-18T12:02:47+5:30

ऑस्ट्रेलियाच्या एका युवा खेळाडूला बाल लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक करण्यात आली. अॅरोन समर्स (Aaron Summers Child Sexual Offence) असे या खेळाडूचे नाव आहे. त्याच्यावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ ठेवण्याचा आरोप आहे.

१७ मे रोजी डार्व्हिन येथील स्थानिक न्यायालयात त्याला हजर केले गेले. समर्सनं नुकतंच अबू धाबी येथे झालेल्या टी १० लीगमध्ये सहभाग घेतला होता. या लीगमध्ये तो डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाचा सदस्य होता.

२४ वर्षीय जलदगती गोलंदाजाला १४ मे रोजी अटक करण्यात आली. त्याच्या घराची तपासणी केली गेली आणि त्याचा मोबाईलही जप्त केला गेला.

त्याच्या मोबाईलमध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडीओ आहेत. शिवाय १० मुलांसोबत संपर्क असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. या मुलांकडूनही अश्लील फोटो मागवण्याचा प्रयत्न झाला.

दोन मुलांसोबत सेक्शुअल कंटेंट ठेवण्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि त्यानं एका मुलाला त्यासाठी फुस लावली.

समर्स हा ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स संघाकडून काहीकाळ खेळला होता. शिवाय वन डे कपमद्ये तो तस्मानियाकडून खेळला होता. पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होता. त्यानं सदर्न पंजाबचे प्रतिनिधित्व केलं होतं. पाकिस्तान सुपर लीगमध्येही तो खेलळा आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!