मनीष पांडे अन् अश्रिता शेट्टी यांच्या रिसेप्शनचा थाटच न्यारा...

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे आणि अभिनेत्री अश्रिता शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत विवाह केला.

30 वर्षीय मनीषने दाक्षिणात्य अभिनेत्रीशी विवाह केला.

मागील काही कालावधीपासून अश्रिता आणि मनीष हे रिलेशनशिपमध्ये आहेत. अश्रिता ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे.

26 वर्षी अश्रितानं Indrajith, Oru Kanniyum Moonu Kalavaanikalum आणि Udhayam NH4 आदी अनेक चित्रपटांत काम केले आहे. लवकरच ती आर पन्नीर्सेलवम यांच्या दिग्दर्शीत चित्रपटातही दिसणार आहे.

मनीषच्या लग्नाला केवळ नातेवाईक आणि काही जवळचे मित्रच उपस्थित होते.

मनीषने भारताकडून 23 वन डे सामन्यांत 1 शतक व 2 अर्धशतकांसह 440 धावा केल्या आहेत. 31 ट्वेंटी-20 सामन्यांत त्यानं 37.66च्या सरासरीनं 565 धावा केल्या आहेत.

त्यांनी आज रिसेप्शन सोहळा ठेवला होता. त्यात माजी कसोटीपटू राहुल द्रविडसह काही विशेष पाहुणे उपस्थित होते.