विद्यार्थ्यांनी फोम शीटच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:08 IST2026-02-18T18:08:27+5:302026-02-18T18:08:37+5:30

तब्बल ३९६ विद्यार्थ्यांचा सहभाग.

Students create a replica of Chhatrapati Shivaji Maharaj using foam sheets | विद्यार्थ्यांनी फोम शीटच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती

विद्यार्थ्यांनी फोम शीटच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती

बोरी- जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जि.प. प्रशाला कौसडी (ता.जिंतूर जि.परभणी) शाळेच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीच्या निमित्ताने आज(दि. १८ फेब्रुवारी २०२६ ) रोजी फोम शीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिवरायांची भव्यदिव्य अशी प्रतिकृती प्रांगणात साकारली. 

कौसडी केंद्रातील जि.प.प्रशाला कौसडी, केंद्रीय प्राथमिक शाळा कौसडी, प्राथमिक ऊर्दू शाळा कौसडी, कन्या शाळा कौसडी असे एकूण तब्बल ३९६ विद्यार्थी व ३९६ फोम शीटच्या साहाय्याने प्रतिकृती साकारून अनोखी मानवंदना देण्यात आली. भूतो न भविष्य डोळ्याचे पारणे फेडणारी १२०० स्क्वेअर फुटातील देखणी, रुबाबदार कलाकृती प्रसिद्ध रंगोळीकार ज्ञानेश्वर आप्पाराव बर्वे यांनी अथक परिश्रम घेऊन तयार केली आहे.

बर्वे सरांना प्रतिमा साकारण्यासाठी सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,या सर्वांनी सहकार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्यदिव्य प्रतिकृती पाहून कौसडी गावांतील प्रत्येकाला शिवबाच्या महाराष्ट्रात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान वाटत होता. या प्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवानंदराव कौसडीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 

तसेच, ज्ञानेश्वर अप्पाराव बर्वे यांचा सत्कार सर्व शाळेचे मुख्याध्यापकासह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य उपस्थित ग्रामस्थ,पत्रकार यांनी केला. फोम शीट व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे चित्रीकरण ड्रोन कॅमेराद्वारे करण्यात आले.  दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दरवर्षी जिल्हा परिषद शाळेत गावकरी व शिक्षक-विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार करण्याचे काम केले जाते, अशी माहिती डॉ महेश देशमुख यांनी दिली.

Web Title : छात्रों ने जयंती पर फोम शीट से शिवाजी महाराज की प्रतिकृति बनाई।

Web Summary : कौसड़ी के छात्रों ने फोम शीट प्रतिकृति बनाकर शिवाजी महाराज की जयंती मनाई। 396 छात्रों ने 396 शीट का उपयोग किया। कलाकार ज्ञानेश्वर बर्वे ने 1200 वर्ग फुट की कलाकृति का नेतृत्व किया। इस कार्यक्रम ने शिवाजी की विरासत पर गर्व बढ़ाया।

Web Title : Students create Shivaji Maharaj replica using foam sheets for Jayanti.

Web Summary : Kausadi students honored Shivaji Maharaj's Jayanti by creating a foam sheet replica. 396 students used 396 sheets. Artist Dnyaneshwar Barve led the impressive 1200 sq ft artwork. The event fostered pride in Shivaji's legacy.