मतमोजणी कक्षात पत्रकारांना जाण्यास बंदी; निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:09 IST2026-01-16T11:09:30+5:302026-01-16T11:09:45+5:30

तीन ठिकाणी विविध प्रभागांची ही मतमोजणी सुरू आहे.

Parbhani municipal Election 2026 Journalists are prohibited from entering the counting room; Election Observer Meghna Kavali's instructions | मतमोजणी कक्षात पत्रकारांना जाण्यास बंदी; निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांचे निर्देश

मतमोजणी कक्षात पत्रकारांना जाण्यास बंदी; निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांचे निर्देश

परभणी : महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून असलेल्या अधिकारी मेघना कावली यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरू असलेल्या कक्षामध्ये माध्यमाच्या प्रतिनिधींना जाण्यासाठी बंदी घातली. तीन ठिकाणी विविध प्रभागांची ही मतमोजणी सुरू आहे. पत्रकारांनी केवळ माध्यम कक्षामध्ये थांबून त्यांना प्रत्येक प्रभागाचा संपूर्ण फेरीनिहाय निकाल पूर्ण झाल्यावर दिला जाईल, अशी भूमिका निवडणूक विभाग आणि प्रशासनाने घेतली आहे. यामुळे पत्रकारांचे प्रशासनाला निवडणूक विभागाला वावडे का असा प्रश्न आहे. 

फेरीनिहाय मतमोजणीला सुरुवात 

महापालिकेच्या निवडणूक मतमोजणी प्रक्रियेमध्ये सर्वच प्रभागांच्या मतमोजणीला फेरीनिहाय सुरुवात झाली आहे. सर्वच प्रभागांमध्ये किमान पाच ते सात फेऱ्या होत आहेत. एक तास झाला तरी अजून कुठलाही निकाल हाती आलेला नाही.

Web Title : मतगणना कक्ष में पत्रकारों का प्रवेश निषेध; चुनाव पर्यवेक्षक का आदेश।

Web Summary : परभणी चुनाव पर्यवेक्षक ने मतगणना कक्षों में मीडिया पर प्रतिबंध लगाया। परिणाम मीडिया कक्ष से समय-समय पर साझा किए जाएंगे। वार्ड प्रति 5-7 राउंड के साथ गिनती जारी है, लेकिन अभी तक कोई परिणाम घोषित नहीं किया गया है। प्रेस प्रशासन के बचाव पर सवाल उठाता है।

Web Title : Journalists barred from counting room; Election Observer's order.

Web Summary : Parbhani election observer bans media from counting rooms. Results will be shared periodically from a media room. Counting is underway with 5-7 rounds per ward, but no results are declared yet. The press questions the administration's avoidance.