परभणी मनपा निवडणूक: पहिल्या दोन तासांत ९.१० टक्के मतदान, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:49 IST2026-01-15T11:48:54+5:302026-01-15T11:49:49+5:30

सकाळी थंडीचा कडाका असतानाही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

Parbhani Municipal Corporation Election: 9.10 percent voting in first two hours; Struggle while finding polling booth | परभणी मनपा निवडणूक: पहिल्या दोन तासांत ९.१० टक्के मतदान, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

परभणी मनपा निवडणूक: पहिल्या दोन तासांत ९.१० टक्के मतदान, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

परभणी: परभणी शहर महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी आज गुरुवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांच्या सत्रात (सकाळी ९:३० पर्यंत) शहरात सरासरी ९.१० टक्के इतके मतदान नोंदवले गेले आहे. एकूण २ लाख ६१ हजार मतदारांपैकी २३ हजार ७८१ मतदारांनी आपला हक्क बजावला असून, दुपारनंतर हा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

कुठे उत्साह, कुठे तांत्रिक बिघाड 
सकाळी थंडीचा कडाका असतानाही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, प्रभाग क्रमांक ४ मधील बूथ क्रमांक १५ आणि प्रभाग १० मधील बूथ क्रमांक १ येथील ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड (एरर) निर्माण झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. भारतीय बाल विद्या मंदिर केंद्रावरील मशीन वारंवार बंद पडत असल्याने मतदारांचा खोळंबा झाला. प्रशासनाने तातडीने बॅलेट युनिट बदलून प्रक्रिया सुरळीत केली.

मतदान केंद्र शोधताना कसरत 
शिवाजी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये १२ वेगवेगळे बूथ असल्यामुळे मतदारांना आपली खोली शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अनेक मतदारांची नावे जुन्या केंद्रावरून नवीन केंद्रावर हलवण्यात आल्याने मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाकडून मदतीसाठी कर्मचारी तैनात असले, तरी केंद्रांची माहिती मिळवण्यासाठी मतदारांना वणवण करावी लागली.

झोननिहाय आकडेवारी

प्रभाग १०, ११, १३: १०.२२ टक्के मतदान (सर्वाधिक)

प्रभाग ८, ९, १४: ९.१४ टक्के मतदान

प्रभाग ३, ४, ५, ६: ७.८८ टक्के मतदान

प्रभाग १२, १५, १६: ७.८३ टक्के मतदान

Web Title : परभणी मनपा चुनाव: धीमी शुरुआत, तकनीकी खराबी, मतदाता भ्रम

Web Summary : परभणी मनपा चुनाव में पहले दो घंटों में 9.10% मतदान हुआ। ईवीएम में तकनीकी खराबी से देरी हुई। मतदाताओं को बूथ ढूंढने और नामों में विसंगतियों का सामना करना पड़ा, जिससे प्रशासनिक सहायता के बावजूद भ्रम हुआ।

Web Title : Parbhani Municipal Election: Slow Start, Technical Glitches, Voter Confusion

Web Summary : Parbhani municipal elections saw a slow start with 9.10% turnout in the first two hours. Technical issues with EVMs caused delays. Voters faced difficulties locating booths and name discrepancies, leading to confusion despite administrative assistance.