विरोधकांचा 'चंद्रपूर पॅटर्न' फसला! परभणीत महापौर निवडीनंतर आ. राहुल पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:23 IST2026-02-12T13:22:43+5:302026-02-12T13:23:54+5:30

या निवडणुकीत केवळ काँग्रेसचच नाही, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि एका अपक्ष नगरसेवकानेही आम्हाला मतदान केले आहे.

Opposition's 'Chandrapur pattern' failed!' Rahul Patil's attack after Uddhav Sena's mayoral election in Parbhani | विरोधकांचा 'चंद्रपूर पॅटर्न' फसला! परभणीत महापौर निवडीनंतर आ. राहुल पाटलांचा हल्लाबोल

विरोधकांचा 'चंद्रपूर पॅटर्न' फसला! परभणीत महापौर निवडीनंतर आ. राहुल पाटलांचा हल्लाबोल

परभणी: "परभणी महापालिकेवर आमचाच महापौर बसणार हे पहिल्या दिवसापासून पक्के होते. विरोधकांनी चंद्रपूरसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा, म्हणजेच घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला, पण उद्धवसेना आणि काँग्रेसचा एकमेकांवरील विश्वास अभेद्य राहिला," अशा शब्दांत उद्धवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला. महापौर निवडीची प्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'मातोश्री'च्या भेटीवर भर नगरसेवकांच्या मुंबई वारीवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना पाटील म्हणाले की, "आमचे नगरसेवक कोणत्याही सहलीला गेले नव्हते. आम्ही त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि मार्गदर्शनासाठी घेऊन गेलो होतो. विरोधकांनी आमचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न केले, मात्र आम्ही तो डाव उधळून लावला."

राष्ट्रवादी आणि अपक्षांचाही पाठिंबा 
या निवडणुकीत केवळ काँग्रेसचच नाही, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि एका अपक्ष नगरसेवकानेही आम्हाला मतदान केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, विरोधकांकडे कोणताही जनाधार उरलेला नाही, त्यांनी आपला पराभव आता खिलाडूवृत्तीने मान्य करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

परभणीचा चेहरामोहरा बदलणार 
सत्तेचा विजय साजरा करतानाच पाटील यांनी भविष्यातील आव्हानांची जाणीव करून दिली. "परभणीसमोर स्वच्छतेपासून ते ड्रेनेजपर्यंत अनेक मोठे प्रश्न आहेत. आमचे नूतन महापौर सय्यद इकबाल यांच्या नेतृत्वात पाणी, वीज आणि रस्ते या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल. परभणीत लवकरच मोठा बदल दिसेल आणि या क्रांतीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title : परभणी: विपक्ष का 'चंद्रपुर पैटर्न' विफल; महापौर चुनाव के बाद विधायक पाटिल का हमला।

Web Summary : विधायक राहुल पाटिल ने परभणी के महापौर चुनाव में विपक्ष द्वारा 'चंद्रपुर पैटर्न' दोहराने के प्रयास की आलोचना की। उन्होंने उद्धव सेना और कांग्रेस की अटूट एकता और एनसीपी (अजित पवार गुट) व निर्दलीयों के समर्थन पर प्रकाश डाला। पाटिल ने नए महापौर के नेतृत्व में परभणी की बुनियादी ढांचागत चुनौतियों का समाधान करने का संकल्प लिया।

Web Title : Parbhani: Opposition's 'Chandrapur Pattern' fails; MLA Patil slams rivals after mayoral win.

Web Summary : MLA Rahul Patil criticized the opposition's attempt to replicate the 'Chandrapur pattern' in Parbhani's mayoral election. He highlighted the unwavering unity between Uddhav Sena and Congress, along with support from NCP (Ajit Pawar faction) and independents. Patil pledged to address Parbhani's infrastructure challenges under the new mayor's leadership.