परभणी मनपात हायव्होल्टेज ड्रामा! प्रचार परवानग्यांसाठी उमेदवारांनी गाठलं आयुक्तांचं केबिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:19 IST2026-01-06T13:18:23+5:302026-01-06T13:19:19+5:30

परभणीत उमेदवारांचा 'प्रक्षोभ'! परवानग्यांसाठी मनपाच्या ढिसाळ कारभाराचा फटका; आयुक्तांच्या दालनात ठिय्या

High voltage drama in Parbhani Municipal Corporation! Candidates reach Commissioner's cabin for campaign permits | परभणी मनपात हायव्होल्टेज ड्रामा! प्रचार परवानग्यांसाठी उमेदवारांनी गाठलं आयुक्तांचं केबिन

परभणी मनपात हायव्होल्टेज ड्रामा! प्रचार परवानग्यांसाठी उमेदवारांनी गाठलं आयुक्तांचं केबिन

- राजन मंगरूळकर 
परभणी:
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असतानाच, प्रशासकीय परवानग्यांच्या प्रक्रियेतील दिरंगाईमुळे उमेदवारांचा संयम सुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून परवानग्यांसाठी चकरा मारणाऱ्या विविध पक्षांच्या उमेदवारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी थेट मनपा आयुक्तांचे दालन गाठले. मनपा आणि आरटीओ विभागाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत ही प्रक्रिया तातडीने सुलभ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कामात सुसूत्रता आणण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारासाठी वाहने, ध्वनिक्षेपक आणि सभांच्या परवानग्या मिळवण्यासाठी एक खिडकी योजना कागदावरच असल्याचे दिसून आल्याने उमेदवार संतप्त झाले होते. यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर आणि आरटीओ अधिकारी आशिष पाराशर यांच्याशी उमेदवारांनी जोरदार चर्चा केली. वाढती गर्दी पाहता प्रवेशद्वारांची संख्या वाढवणे आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वाढवून प्रक्रिया जलद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

या आंदोलनात काँग्रेसचे भगवानराव वाघमारे, अमोल जाधव, दिलीपसिंह ठाकूर यांच्यासह अनेक अपक्ष आणि प्रमुख पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. "प्रचारासाठी आधीच वेळ कमी आहे, त्यात तांत्रिक कामात आमचा वेळ वाया जात आहे," अशी भावना उमेदवारांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title : परभणी नगर निगम में प्रचार अनुमति को लेकर हंगामा।

Web Summary : परभणी नगर निगम में प्रचार अनुमति में देरी के कारण उम्मीदवारों ने विरोध प्रदर्शन किया। निराश उम्मीदवारों ने आयुक्त से मुलाकात कर वाहनों और रैलियों के लिए अनुमति प्रक्रिया तेज करने की मांग की। आयुक्त ने प्रक्रिया में तेजी लाने के लिए अधिक कर्मचारियों और प्रवेश बिंदुओं का आश्वासन दिया।

Web Title : High drama in Parbhani Municipal Corporation over campaign permits.

Web Summary : Candidates protested at Parbhani Municipal Corporation due to delays in campaign permit approvals. Frustrated candidates met with the commissioner demanding faster processing of permissions for vehicles and rallies. The commissioner assured increased staffing and entry points to expedite the process.