प्रचाराच्या परवानगीला विलंब, परभणीत मनपाच्या एक खिडकीसमोर कार्यकर्त्यांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:11 IST2026-01-05T13:11:05+5:302026-01-05T13:11:34+5:30
विविध पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज देऊन शुल्क भरून परवानग्या घेतल्या जातात.

प्रचाराच्या परवानगीला विलंब, परभणीत मनपाच्या एक खिडकीसमोर कार्यकर्त्यांचे आंदोलन
- राजन मंगरूळकर
परभणी : निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्याने या प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांच्या परवानगी सोबतच विविध प्रकारच्या सभा, रॅली, झेंड्याच्या परवानगीला देण्यासाठी ढिसाळ नियोजनामुळे विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला. उमेदवार प्रतिनिधींकडून परभणी मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर एक खिडकी योजनेच्या परिसरात काही वेळ आंदोलन करण्यात आले. सुमारे पंधरा मिनिटे हे आंदोलन झाले.
विविध पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज देऊन शुल्क भरून परवानग्या घेतल्या जातात. मात्र, परवानगी देताना अनेकांना विलंबाचा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे रविवारचा दिवस गेला, आता सोमवार सुरू झाल्याने अशाच गर्दीचा फटका बसल्यास हाही दिवस वाया जाईल, याची अनेकांना धास्ती पडली आहे. त्यामुळे एक खिडकी योजनेच्या कार्यालय परिसरात गेल्या विविध उमेदवारांच्या प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्याकडून मनपाने नियोजन लावून लवकरात लवकर प्रत्येकाला त्यांचे लागणारे परवानगी देण्यात याव्यात यासाठी हे आंदोलन केले. याबाबत पोलीस तसेच आरटीओ यंत्रणा यांच्याशी उमेदवार प्रतिनिधींनी संवाद साधला.