परभणीची महापौर, उपमहापौर निवडीची विशेष सभा पुढे ढकलली, नवी तारीख कोणती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:21 IST2026-02-04T11:21:19+5:302026-02-04T11:21:50+5:30
महापौर पदासाठी १४ आणि उपमहापौर पदासाठी सात अर्ज आले आहेत.

परभणीची महापौर, उपमहापौर निवडीची विशेष सभा पुढे ढकलली, नवी तारीख कोणती?
परभणी : महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी ९ फेब्रुवारीला विशेष सभा होणार होती. मंगळवारी रात्री विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी परभणी मनपाच्या या प्रक्रिये संदर्भात नवीन आदेश काढून ही निवड प्रक्रिया १२ फेब्रुवारीला घेण्यात यावी असे आदेशित केले आहे.
महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. महापौर पदासाठी १४ आणि उपमहापौर पदासाठी सात अर्ज आले. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालाची मतमोजणी याच दिवशी असल्याने मनपाची महापौर उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया १२ फेब्रुवारीला घेण्यात यावी असे सुधारित आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांना दिले आहेत.
महापौरपदासाठी १४, उपमहापौर पदासाठी सात नामनिर्देशन दाखल
महापालिकेच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत महापौर पदासाठी एकूण १४ तर उपमहापौर पदासाठी सात नाम निर्देशन पत्र दाखल झाले आहेत. यामध्ये उपमहापौर पदासाठी उद्धव सेना १, भाजप २, राष्ट्रवादी एक, काँग्रेस तीन नगरसेवकांचे अर्ज दाखल झाले. खेळीमेळीच्या वातावरणात एकत्रित भरलेले हे अर्ज पाहता आता माघारीसाठी कोणाचा बळी घेतला जाणार हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.
महापौरपदासाठीचे सादर नामनिर्देशन
उमेदवार प्रभाग पक्ष
सय्यद समी ८ड उद्धवसेना
स. इकबाल स. खाजा ८ क उद्धवसेना
श्याम खोबे १६ क उद्धवसेना
शरफुद्दीन सिद्दिकी ३ड उद्धवसेना
दिलीपसिंह ठाकूर ९ड उद्धवसेना
प्रतिभा सरोदे ४अ उद्धवसेना
मीना वरपुडकर ५ क भाजप
डॉ. केदार खटिंग १५ ३ भाजप
तिरूमला खिल्लारे १ ब भाजप
रितेश झांबड ५ड भाजप
भगवान वाघमारे ९अ काँग्रेस
गणेश देशमुख १ड काँग्रेस
गुलमीर खान ७ क काँग्रेस
अर्जुन सामाले १० क राष्ट्रवादी (अ.प.)
उपमहापौरपदासाठीचे दाखल नामनिर्देशन
उमेदवार प्रभाग पक्ष
भगवान वाघमारे ९अ काँग्रेस
गणेश देशमुख १ड काँग्रेस
गुलमीर खान ७क काँग्रेस
श्याम खोबे १६ क उद्धवसेना
तिरुमला खिल्लारे १ ब भाजप
विश्वजीत बुधवंत ४ क भाजप
नाजेमा बेगम ६ब राष्ट्रवादी (अ.प.)
महापौर पदासाठी पक्षनिहाय अर्ज
उद्धव सेना ६
भाजप ४
राष्ट्रवादी १
काँग्रेस ३