भारताची भावना जाट ऑलिम्पिकसाठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 03:23 AM2020-02-16T03:23:23+5:302020-02-16T03:23:46+5:30

भावना जयपूरमध्ये कोच गुरमुख सिहाग यांच्या मार्गदर्शनात सराव करते

Indian spirit deserves Jat Olympics | भारताची भावना जाट ऑलिम्पिकसाठी पात्र

भारताची भावना जाट ऑलिम्पिकसाठी पात्र

Next

रांची : भारतीय खेळाडू भावना जाट हिने शनिवारी राष्टÑीय अजिंक्यपद स्पर्धेच्या २० कि. मी. चालण्याच्या शर्यतीत नव्या राष्टÑीय विक्रमाची नोंद करीत २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकची देखील पात्रता गाठली. राजस्थानची २३ वर्षांची भावना हिने १:२९.५४ सेकंद वेळेची नोंद करीत आॅलिम्पिकची पात्रता गाठली. आॅलिम्पिकची पात्रता वेळ १:३१.०० सेकंद अशी आहे. गरीब शेतकरी कुटुंबातील या मुलीने मागच्या वर्षी आॅक्टोबरमध्ये झालेल्या राष्टÑीय अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान नोंदविलेला स्वत:चा १:३८.३० सेकंदांचा विक्रम मागे टाकून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह आज सुवर्ण जिंकले. प्रियंका गोस्वामीने १:३१.३६ सेकंद वेळ नोंदविल्याने ती मात्र टोकियोच्या तिकिटापासून वंचित राहिली.

भावना जयपूरमध्ये कोच गुरमुख सिहाग यांच्या मार्गदर्शनात सराव करते. ती ज्युनियर स्तरावर कधीही खेळली नाही शिवाय भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या कुठल्याही शिबिरात तिचा सहभाग नव्हता. सिनियर स्तरावर २०१६ ला राष्टÑीय आंतरराज्य स्पर्धेत तिने पदार्पण केले होते. हैदराबादमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत भावना पाचव्या स्थानी होती. भारतीय रेल्वेच्या कोलकाता कार्यालयात भावना तिकीट निरीक्षक आहे. जयपूरच्या मानसिंग स्टेडियमबाहेरच्या सडकेवर ती नियमित सराव करते.भावना आता जपानमध्ये १५ मार्च रोजी होणाऱ्या आशियाई चालण्याच्या शर्यतीत सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)

‘माझे स्वप्न साकार झाले. सरावादरम्यान १:२७.०० सेकंद अशी वेळ नोंदवित होते. परिस्थिती अनुकूल राहिल्यास आॅलिम्पिक पात्रता गाठणे कठीण नाही, याची जाणीव होतीच. १:३१.०० सेकंदात मी २० कि. मी. शर्यत पूर्ण करू शकते. मागील काही महिन्यात कोचसह मी गाळलेल्या घामाचे हे बक्षीस आहे.’
- भावना जाट, चालण्याच्या शर्यतीची भारतीय खेळाडू.
 

Web Title: Indian spirit deserves Jat Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.