“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 06:37 IST2026-01-09T06:37:56+5:302026-01-09T06:37:56+5:30
सोलापूर येथे मनसे उमेदवाराच्या हत्येनंतर याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.

“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहिल्यानंतर ही आजवरची घाणेरडी निवडणूक असल्याची टीका मनसे नेते अमित ठाकरे यांनी बुधवारी रात्री केली. नवी मुंबईतल्या युतीच्या उमेदवारांच्या भेटीदरम्यान त्यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी संवाद साधला. सोलापूर येथे मनसे उमेदवाराच्या हत्येनंतर याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.
महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही सुरू आहे. अनेकांचे अर्ज मागे घेतले जात आहेत, काहींना विकत घेतले जात आहे, खूनही होत आहेत. याकडे अमित यांनी लक्ष वेधले. केंद्र, राज्यापाठोपाठ भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थाही हव्या आहेत. त्या हाती गेल्यास सगळे संपले, असेही ते म्हणाले.