परांजपेंसाठी नवी मुंबई ठरू शकते फायद्याची, विचारेंना ठाणे, कोपरी प्लस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:30 PM2019-04-09T23:30:19+5:302019-04-09T23:30:37+5:30

कसे असणार मतांचे गणित : नवी मुंबई, मीरा-भाईंदर राष्ट्रवादीला निर्णायक

Navi Mumbai for Paranjape can be beneficial, Ideas Thane, Kopri Plus | परांजपेंसाठी नवी मुंबई ठरू शकते फायद्याची, विचारेंना ठाणे, कोपरी प्लस

परांजपेंसाठी नवी मुंबई ठरू शकते फायद्याची, विचारेंना ठाणे, कोपरी प्लस

Next

- अजित मांडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे मतदारसंघात इतर उमेदवार असले, तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी अशीच होणार आहे.
मागील लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीच्या हातातील तीन विधानसभा मतदारसंघ निसटले, तर शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याला आता पाच मतदारसंघ आले आहेत; परंतु आता मोदीलाट ओसरली असल्याने राष्टÑवादीने ओवळा-माजिवडा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांवर आपली मदार ठेवली आहे. तर, मीरा-भार्इंदरमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतांचा जोगवा मिळण्याची शक्यता आहे. ठाणे, कोपरी, पाचपाखाडी हा मतदारसंघ निवडणुकीचा निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.


२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह इतर काही छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी खरी लढत ही राष्टÑवादी आणि शिवसेनेतच होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, मीरा-भार्इंदर, ओवळा-माजिवडा, ऐरोली, बेलापूर या सर्वच विधानसभा मतदारसंघांतून राष्टÑवादीची पीछेहाट झाली होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. राष्टÑवादीचा तीन विधानसभा मतदारसंघांत पराभव झाला. केवळ, ऐरोली मतदारसंघच त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले. शिवाय, महापालिका निवडणुकांमध्येसुद्धा नवी मुंबई वगळता, ठाणे आणि मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेना, भाजपचे नगरसेवक वाढलेले आहेत. परंतु, आता नवी मुंबई महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता असल्याने या ठिकाणी शिवसेनेच्या मतांचा टक्का घटेल, असे बोलले जात आहे. तर, याच दोन मतदारसंघांतील मते राष्टÑवादीसाठी निर्णायक आणि निकालाला कलाटणी देणारी ठरू शकणार आहेत. शिवाय, मीरा-भार्इंदरमध्ये काँग्रेसने राष्टÑवादीला मदत केली, तर काहीअंशी मते वाढण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेसाठी कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, ओवळा-माजिवडा हे तीन मतदारसंघ निर्णायक ठरणार असून तेच टर्निंग पॉइंट ठरूशकणार आहेत.

दोन उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभाग
ऐरोली आणि बेलापूरमध्ये सध्या नाईक फॅमिलीचे वर्चस्व आहे; परंतु मागील महापालिका निवडणुकीत या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाढ झालेली आहे, असे असले तरी हा पट्टा राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठी निर्णायक ठरूशकणार आहे.
ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रांतील मतपेट्या या शिवसेनेसाठी नेहमीच निर्णायक ठरल्या आहेत. या दोनही मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचा ९९ टक्के भरणा आहे. त्यामुळे नवी मुंबईत राष्टÑवादीने लीड घेतले, तरी तो हा पट्टा मोडू शकतो.
मागील निवडणुकीत शिवसेनेला ऐरोली २५ हजार, बेलापूर २० हजार, ठाणे ६० हजार, कोपरी-पाचपाखाडी ६८ हजार, ओवळा-माजिवडा ५८ हजार आणि मीरा-भार्इंदरमध्ये ४२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे ते तोडण्याचे आव्हान राष्टÑवादीसमोर असणार आहे.

2009
ऐरोली, बेलापूर, ओवळा -माजिवडा येथे नाईक यांना जास्तीची मते मिळाल्यामुळे निकालाची दिशा बदलली होती.

2014
या ठिकाणाहून विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी येथून एकगठ्ठा मते मिळाली होती.

Web Title: Navi Mumbai for Paranjape can be beneficial, Ideas Thane, Kopri Plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.