नवी मुंबई महानगर पालिकेचा ६७०४ कोटी ४३ लाखांचा अर्थसंकल्प सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:30 IST2026-03-30T13:21:51+5:302026-03-30T13:30:19+5:30

नवी मुंबई महानगर पालिकेचा  २०२६ - २७ साठी ६७०४  कोटी ४३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प विशेष महासभेत स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सादर केला.

Navi Mumbai Municipal Corporation presents budget of Rs 6704 crore 43 lakh | नवी मुंबई महानगर पालिकेचा ६७०४ कोटी ४३ लाखांचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई महानगर पालिकेचा ६७०४ कोटी ४३ लाखांचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई महानगर पालिकेचा  २०२६ - २७ साठी ६७०४  कोटी ४३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प विशेष महासभेत स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सादर केला. शहरवासीयांवर कोणतीही करवाढ केली जाणार नाही. महानगर पालिका कर्जरोख्यातून ४०० कोटी उभारणार असून १०० कोटी रूपये कर्ज घेणार आहे.

महानगर पालिकेने आयोजित विशेष सभेत स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी महापौर सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला. महानगर पालिका कोणतीही करवाढ करणार नाही. शहरात उड्डाणपुलांचे जाळे तयार केले जाणार आहे. आरोग्य व्यवस्था बळकट करण्यात येणार आहे. शहरातील हरीत पट्टे वाढविण्यात येणार आहेत.  ़

महसूल वाढविण्याबरोबर कर्जरोखे व कर्ज घेऊन निधी उभारला जाणार आहे. महानगर पालिकेने २०२५ - २६ मध्ये ५७०९ कोटीचा अर्थसंकल्प तयार केला होता. वर्षअखेरीस ५८३० कोटी अशा सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे.

Web Title : नवी मुंबई महानगर पालिका ने 6704.43 करोड़ का बजट पेश किया, कोई कर वृद्धि नहीं।

Web Summary : नवी मुंबई महानगर पालिका ने 2026-27 के लिए 6704.43 करोड़ रुपये का बजट पेश किया, जिसमें बुनियादी ढांचे के विकास और स्वास्थ्य सेवा को मजबूत करने पर ध्यान केंद्रित किया गया है। कोई नया कर नहीं लगाया जाएगा। निगम हरित क्षेत्र को बढ़ाने और फ्लाईओवर बनाने के लिए बांड और ऋण के माध्यम से धन जुटाएगा।

Web Title : Navi Mumbai Municipal Corporation presents ₹6704.43 crore budget without tax hikes.

Web Summary : Navi Mumbai Municipal Corporation's ₹6704.43 crore budget for 2026-27 focuses on infrastructure development and strengthening healthcare. No new taxes will be levied. The corporation will raise funds through bonds and loans to enhance green spaces and construct flyovers.