सिंगापूरवरून दांपत्य मतदानासाठी नवी मुंबईत; वाशीमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले

By नामदेव मोरे | Published: May 20, 2024 01:56 PM2024-05-20T13:56:37+5:302024-05-20T13:58:52+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईत  सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत.

lok sabha election 2024 a couple come from singapore to navi mumbai for voting | सिंगापूरवरून दांपत्य मतदानासाठी नवी मुंबईत; वाशीमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले

सिंगापूरवरून दांपत्य मतदानासाठी नवी मुंबईत; वाशीमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले

नामदेव मोरे,नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईत  सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत.  सिंगापूर वरून खास मतदानासाठी आलेले दिक्षित दांपत्यानेही वाशीमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

सलील शशिकांत दिक्षित व सुप्रीया दिक्षित ८ वर्षापासून सिंगापूर ला राहतात. प्रत्येक निवडणुकीसाठी आवर्जून मतदानासाठी येत असतात.  सानपाडामध्ये राहणा-या दिक्षित यांचे मतदान वाशीतील केंद्रावर होते. याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पण सिंगापूर वरून येथे आलो मग सानपाडामधून वाशीत जाणे काही गैरसोयीचे नाही. मतदान हा आपला हक्क  व कर्तव्य ही आहे. प्रत्येकाने कर्तव्य बजावावे व मतदान आवश्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: lok sabha election 2024 a couple come from singapore to navi mumbai for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.