Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबईत शक्यता धूसर; दोन्ही पक्षांकडून १११ जागांसाठी तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:47 IST2025-12-29T10:46:38+5:302025-12-29T10:47:45+5:30
Navi Mumbai Municipal Election 2026: जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने रविवारी दिवसभरात या विषयावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांत संभ्रमाचे वातावरण आहे. असे असले तरी दोन्ही पक्षांनी सर्व १११ जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार ठेवली आहे.

Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबईत शक्यता धूसर; दोन्ही पक्षांकडून १११ जागांसाठी तयारी
नवी मुंबई : येथे भाजप-शिंदेसेना युतीची शक्यता धूसर आहे. जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने रविवारी दिवसभरात या विषयावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांत संभ्रमाचे वातावरण आहे. असे असले तरी दोन्ही पक्षांनी सर्व १११ जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार ठेवली आहे.
भाजपकडून शिंदेसेनेसमोर ९१–२० असा जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडण्यात आला होता. परंतु, शिंदेसेनेने ५७ जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे शिंदेसेनेकडून वाटाघाटीसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे युतीच्या चर्चेला ब्रेक लागल्याचा आरोप भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी केला. तसचे युतीसाठी भाजप सकारात्मक आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत युतीचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.