Women's News Updates : Hyderabad safest cities women india | मुंबई नाही तर भारतातील 'या' शहरात महिला सगळ्यात जास्त सुरक्षित; सर्वेक्षणातून माहिती समोर

मुंबई नाही तर भारतातील 'या' शहरात महिला सगळ्यात जास्त सुरक्षित; सर्वेक्षणातून माहिती समोर

(image Credit- Scroll.in)

भारतातील सर्वच शहरं महिलांसाठी सुरक्षित आहेत असं अजिबात नाही. त्यातल्या त्यात दिल्ली आणि उत्तर प्रदेशात महिलांना सगळ्यात जास्त धोका असल्याचे वारंवार वेगवेगळ्या घटनांमधून दिसून येतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यात महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुलनेने  मुंबईत महिला जास्त सुरक्षित आहे असं  मानलं जात  होतं. याशिवाय अनेक सर्वेक्षणामधून मुंबई महिलांसाठी सुरक्षित असल्याचं दिसून आलं होतं. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून महिलांच्या सुरक्षेबाबत नवीन माहिती समोर आली आहे. 

भारतातील हैदराबाद हे  शहर महिलांसाठी सगळ्यात सुरक्षित असलेलं शहर आहे. इतर सर्व राज्य सरकारांनी तेलंगणा सरकारचे हे संकेत घेणे आवश्यक आहे. तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार, महिलांना हैदराबादमध्ये अत्यंत सुरक्षित वाटते. या शहरात ते रात्री उशिरा प्रवास करू शकतील. ऑटो, कॅब बुक करु शकतील आणि अनोळखी लोकांमध्ये वावरतानाही भीती न बाळगता त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचू शकतील.

महिलांसाठी  सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या सर्व प्रभावी उपायांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तेलंगणा सरकारने महिलांच्या सुरक्षितेसाठी एसएचई टीम, भरोसा सेंटर, डायल 100, मोबाईल अ‍ॅप्स मधील एसओएस बटणे इत्यादी विविध उपक्रम सुरू केले आहेत. तेलंगणा टुडेने शहरातील विविध स्त्रियांना सुरक्षित फिरताना सुरक्षित वाटते की नाही हे पाहण्याचे सर्वेक्षण केले. हैदराबाद हे भारतातील स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे.

शबनम नावाच्या एका महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, '' मी रात्रीच्या वेळीसुद्धा शहराच्या कुठल्याही भागात जाऊन प्रवास करू शकते आणि प्रत्येक स्त्रीला ज्या  सुरक्षा सुविधा असायला हव्यात या सुविधा या शहराकडून पुरवल्या जात आहेत. हैदराबाद काम करण्यासाठी आणि राहण्यासाठी एक सुरक्षित  ठिकाण बनविल्याबद्दल मी राज्य सरकार आणि पोलिसांचे आभार मानते.''

पुढे त्यांनी सांगितले की, ''हैदराबाद हे बहुतेक शहरांपेक्षा सुरक्षित मानले जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे पोलिस दल अधिक सुलभ आहे आणि जेव्हा एखादी महिला त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा छळ केल्याबद्दल तक्रार नोंदवते तेव्हा लगेच प्रतिसाद दिला जातो.  हैदराबाद ही महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे, याचा मला आनंद आहे. परंतु उर्वरित देशाची मला चिंता वाटते. सर्व राज्यांनी महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कठोर उपक्रम राबवायला हवेत. महिलांच्या समस्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.''

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Women's News Updates : Hyderabad safest cities women india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.