यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 06:22 IST2026-01-10T06:22:36+5:302026-01-10T06:22:36+5:30
आर्थिक सर्वेक्षण अहवाल २९ जानेवारीला सादर होण्याची शक्यता आहे.

यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होणार असून ते २ एप्रिल पर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी शुक्रवारी दिली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील आणि केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील. यंदा १ फेब्रुवारी ही अर्थसंकल्प सादर करण्याची निश्चित तारीख रविवारी येत आहे. पण तो रविवारीच सादर करणार का? याचा तपशील रिजिजू यांनी दिलेला नाही.
आर्थिक सर्वेक्षण २९ जानेवारीला
आर्थिक सर्वेक्षण अहवाल २९ जानेवारीला सादर होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी रोजी संपेल. त्यानंतर ९ मार्च रोजी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होईल. १३ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत संसदेची सुट्टी राहणार आहे.
